गरिबी देशासमोरील आव्हान : गडकरी

nitin gadkari
nitin gadkari

नागपूर :  आपल्या देशासमोर गरिबी हे एक आव्हान आहे. या आव्हानाचा सामना करून विजय मिळविण्यासाठी सामाजिक-आर्थिक परिवर्तन करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागास भागाचा विकास आणि रोजगार निर्मिती हाच मार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

हिरो एन्टरप्राईजेसतर्फे आयोजित एका परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते. गडकरी म्हणाले, कोविडचे संकट संपूर्ण जगासमोर आहे. या संकटावर सकारात्मकता आणि आत्मविश्वासाने मात करणे शक्य आहे. यासोबतच आर्थिक संकटाचा सामना करून आम्हाला अर्थव्यवस्थेला पुढे न्यायचे आहे. स्वातंत्र्यापूर्वी व नंतर देशातील जनतेने अनेक नैसर्गिक व अनैसर्गिक संकटांचा यशस्वी सामना केला आहे. चीन व पाकिस्थानशी युध्द झाले आहे.

 नक्षलवाद, दहशतवादाचा सामना आपण केला आहे. या संकटावरही मात करून आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांनी व्यत केला. मागास भाग आणि शेतकऱ्यांचा विकास करू शकलो तर समाजाला फायदा होईल. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन ही देशाची गरज आहे. राष्ट्र पुनर्निर्माणाचा हाच मार्ग आहे. एमएसएमईबद्दल बोलताना ते म्हणाले की एमएसएमईची व्याख्या आम्ही बदलून टाकली. अनेक बदल केले. सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांच्या उलाढालीची मर्यादा वाढविली. बँक, आयकर, जीएसटी रेकॉर्ड चांगल्या असलेल्या उद्योगांना भांडवल उभे करण्यास मदत करीत आहोत.

संपादन- अनिल यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com