आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन करा, गडकरींनी दिला कानमंत्र

nitin gadkari.
nitin gadkari.

नागपूर : कोरोनाने एकूणच जागतिक अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे भारतही त्याला अपवाद नाही.मात्र लवकरच ही स्थिती बदलेल असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. मागास भागाचा सामाजिक, आर्थिक विकास करताना आणि नवीन उद्योगांची निर्मिती करताना वाहतूक, ऊर्जा खर्च, मजुरांवर होणार्‍या खर्चात बचत करून अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. उद्योगातून मिळणार्‍या उत्पादनाच्या दर्जात कोणताही समझोता न करता हे उत्पादन आंतरराष्ट्रीय दर्जाचे कसे होईल, हा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे, असे सांगत ना. गडकरी म्हणाले, सतत अधिक संशोधन व आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन यासंदर्भात कोणताही समझोता उद्योगांनी करू नये.

देशातील सूक्ष्म, मध्यम व लघु (एमएसएमई) उद्योगांचा रोजगार निर्मितीत महत्त्वाचा सहभाग असून यामुळे गरिबी निर्मूलनासही मदत झाली आहे. उद्योग क्षेत्राने दररोज नवीन संशोधन करणे आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ‘फिकी’च्या महिला संघटनेशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ना. गडकरी संवाद साधत होते.

कोरोना संक्रमणाने सर्वांसमोरच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. भीती आणि निराशेचे वातावरण आहे. सकारात्मकता आणि आत्मविश्वासामुळे आपण यावरही मात करू असे सांगताना ना. गडकरी म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्था गतीने उदयास येणारी आहे. अशा स्थितीत अर्थव्यवस्थेस अधिक गती देण्यासाठी उद्योगांमध्ये सार्वजनिक खाजगी गुंतवणूक आणि परकीय गुंतवणूक आणणे आवश्यक आहे. तसेच ग्रामीण उद्योगांचा विकास करून, रोजगार निर्मिती वाढविणे गरजेचे आहे. हे करताना ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या कृषी मालावर आधारित उद्योग निर्मिती, उपलब्ध असलेल्या कच्च्या मालाचा वापर करून नवीन उत्पादनांची निर्मिती करण्यास प्राधान्य मिळावे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com