आता लहानपण नको रे देवा...

exam.jpg
exam.jpg

नागपूर : लहानपण देगा देवा मुंगीसाखरेचा रवा, असे म्हणण्याचे दिवस आता उरले नाहीत. परीक्षा आणि परीक्षांच्या वाढत्या तणावात ही मुले सारखी पळत राहतात आणि हे लहानपण नकोसे होते. दहावी-बारावीत तर सतत मानगुटीवर परीक्षांचे भूत बसलेलेच असते. प्रत्येकालाच डॉक्‍टर किंवा इंजिनीयर बनायचे असल्यामुळे बोर्डाच्या परीक्षांबरोबरच प्रवेश परीक्षा देणे भागच असते.
आयआयटीसह एनआयटी आणि देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठीच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (एनटीए) सोमवारपासून जॉइंट एंटरन्स एक्‍झामिनेशन (जेईई मेन)ला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन्ही पेपरमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) पुस्तकावर आधारित प्रश्‍न विचारण्यात आलेत. तिन्ही विषयांपैकी गणित विषयात विद्यार्थ्यांना प्रश्‍न सोडविण्यात बरीच मेहनत घ्यावी लागल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

आयआयटीसह एनआयटी आणि देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी "एनटीए'द्वारे जेईई मेन परीक्षेचे आयोजन करण्यात येते. मागील दोन वर्षांपासून देशात दोनदा या परीक्षेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार एप्रिलमध्ये 3 ते 9 दरम्यान दुसरी परीक्षा घेण्यात येईल.
बीई, बीटेक अभ्यासक्रमासाठी कॉम्प्युटर मोडवर तर बी. आर्च पार्ट- 1 आणि पार्ट- 2 कॉम्प्युटर आणि ड्रॉइंग टेस्ट पेन-पेपर मोडवर सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 आणि दुपारी 2.30 ते 5.30 दरम्यान घेण्यात आलेत. या वेळी परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयावर 25-25 प्रश्‍न विचारण्यात आलेत. सोडविलेल्या प्रत्येक प्रश्‍नाच्या योग्य उत्तरासाठी 4 गुण देण्यात येतील. परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असल्याने चुकीच्या उत्तरावर 1 गुण वजा करण्यात येणार आहे. मात्र, न सोडविलेल्या प्रश्‍नावर निगेटिव्ह मार्किंग होणार नाही.

जेईई मेन परीक्षा अकरा भाषांमध्ये

2021 पासून जेईई मेन परीक्षा अकरा भाषांमध्ये घेण्यात येईल. यामध्ये आसामी, बंगाली, मराठी, उडिया, तमिळ, तेलुगू, उर्दू या भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. पेपरचे निकाल 31 जानेवारीला येण्याची शक्‍यता आहे. यामध्ये ठरविलेल्या कट ऑफनुसार विद्यार्थी जेईई ऍडव्हान्ससाठी पात्र ठरेल. त्यासाठी साधारणत: मे महिन्यात परीक्षा घेण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com