सेक्‍स रॅकेटवर पोलिसांचा छापा, परराज्यातील दोन तरूणी ताब्यात

Sex-Racket
Sex-Racket

अनिल कांबळे
नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकानजिक असलेल्या हॉटेल क्रिष्णामध्ये सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटवर गुन्हे शाखा पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात दोन तरूणींना देहव्यापार करताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. तरूणींना सेक्‍स रॅकेटमध्ये ढकलणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपेठ बसस्थानक परिसरात फ्लॅगशिप क्रिष्णा ओयो हॉटेल येथे गेल्या काही महिन्यांपासून सेक्‍स रॅकेट सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एसएसबी पथकाचे किशोर पर्वते यांना मिळाली. त्यांनी पंटर पाठवून शहानिशा केली.

सोमवारी दुपारी क्रिष्णा हॉटेलजवळ सापळा रचला. पंटरला पोलिसांनी हॉटेलमध्ये पाठवले. त्याने दलाल पिंटू उर्फ किशोर भिमराव कांबले (वय 35, नागपूर) याची भेट घेतली. त्याला दोन तरूणींची मागणी केली. त्यासाठी प्रतीतास 5 हजार रूपयांमध्ये सौदा पक्‍का झाला. अन्य दलाल रेहान उर्फ रमजान पठाण ( 30, नेवासा, अहमदनगर) याने हॉटेलमधील एका रूममध्ये असलेल्या दोन तरूणींना बोलावले. दोनपैकी एका तरूणीची निवड पंटरने केली आणि हॉटेलमधील अन्य एक रूम त्यांना उपलब्ध करून देण्यात आली. तर दुसरी तरूणी पुन्हा आपल्या रूममध्ये निघून गेली. पंटरने वेळ बघून पोलिसांना इशारा दिला. पोलिसांनी लगेच हॉटेलवर छापा घालून दोन्ही तरूणींना ताब्यात घेतले. तर मुख्य दलाल पिंटू कांबले याला अटक केली. छापा पडताच दलाल रेहान पठाण हा पळून गेला. या प्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पिंटूला अटक करण्यात आली.

काश्‍मिर-पंजाबच्या तरूणींची मागणी
नागपुरातील सेक्‍स रॅकेटमधील दलालांकडे महाराष्ट्र सोडून अन्य राज्यातील तरूणींना मोठी मागणी आहे. काश्‍मिर, गुजरात, उत्तरप्रदेश, चेन्नई आणि कोलकातासह बांगलादेशातील तरूणींना आंबटशौकीन पसंती दर्शवितात. त्यामुळे विमानाचा खर्च करून दलाल तरूणींना मोठमोठ्या हॉटेलमध्ये 10 ते 15 दिवसांच्या लाखो रूपयांच्या करारावर बोलवित असल्याची माहिती आहे.

गणेशपेठ पोलिसांची भूमिका
गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्‌दीतील बऱ्याच हॉटेलमध्ये आणि लॉजमध्ये सेक्‍स रॅकेट सुरू आहेत. सेक्‍स रॅकेटवर छापा घालू नये म्हणून दलाल गणेशपेठ पोलिसांशी अर्थपूर्ण व्यवहार करतात. यातून महिन्याकाठी लाखोंची कमाई होत आहे. सेक्‍स रॅकेटमधील दलालाकडून पोलिसांसाठी वसुलीचे काम स्वतःला सामाजिक कार्यकर्ता समजणारी एक महिला करीत असल्याची चर्चा पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com