Video : मी पुन्हा आलो... नववर्षाच्या स्वागतासाठी, कोण आहे 'तो' वाचा... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

दिवसभर गार वाऱ्यामुळे नागपूरकर स्वेटर, उणी कपड्यांत दिसून आले तर काही चौकांमध्ये शेकोटीचाही आधार नागरिकांनी घेतला. उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे मध्य भारतात थंडीचा जोर वाढला आहे. डिसेंबरमध्ये नागपूर गारठण्याची गेल्या काही वर्षांत पडलेली प्रथा यंदाही कायम दिसून येत आहे. 

नागपूर : पाऊस काही केल्या नागपूरकरांचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. मॉन्सून परत गेल्यानंतरही तो परत परत येत आहे. "मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल... मी पुन्हा येईल...' जणू असाच तो वागत आहे. आतापर्यंत अवकाळी पावसाने दोनदा हजेरी लावली. आता कडाक्‍याची थंडी पडली असताना तो नववर्षाच्या स्वागतासाठी पुन्हा आला आहे. पाऊस एक आणि दोन जानेवारील वादळी वारे व गारपीट घेऊन येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असताना मंगळवारी पहाटे व दुपारी एक वाजताच्या सुमारास हजेरी लावली. यामुळे गारठा चांगलाच वाढला आहे. 

यंदा उशिराने आलेल्या पावसाने विदर्भात चांगलाच धुमाकूळ घातला. सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळला. त्यानंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. मॉन्सून परतल्यानंतरही पाऊस विदर्भातून जायचे काही नाव घेत नाही आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाही पाऊस येऊन गेला. तो आता जाईल, असे वाटत असताना आता तो एक व दोन जानेवारीला पुन्हा हजेरी लावणार आहे.

सविस्तर वाचा - मजूर काचा घेऊन बांबूवर चढला अन्‌ वाहिनीवर कोसळला...

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार एक जानेवारीला वादळासह गारपीट तर दोन जानेवारी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांना सर्तक राहण्याचा इशाराही दिला आहे. मात्र, मंगळवारी पहाटे व दुपारी पावसाने हजेरी लावून नागपूरकरांना वेढीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. "मी आलो... मी आलो... मी आलो...' जणू असेच त्याला म्हणायचे आहे.

Image may contain: 1 person, outdoor

उरलेसुरले पिकही येणार धोक्‍यात

वारंवार येणारा अवकाळी पाऊस आणि कडाक्‍याच्या थंडीने शेतमालाचे मोठे नुकसान होणार आहे. नुकतीच दोन लाखांची कर्जमाफी झाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांना घोषित केली नाही. यात आणखी कोळणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे उरलेसुरले पिकही धोक्‍यात येणार आहे.

काय? - अस्सल नागपुरी "दिमाग'; घरातच उघडले चक्क पेट्रोल पंप

लवकरच शुकशुकाट

सध्या नागपूरमध्ये कडाक्‍याची थंडी पडली आहे. पारा पाच अंशापर्यंत खाली घसरला आहे. सध्या नागपूरकरांना थंडीने दिवसभर स्वेटर वापरायला भाग पाडले आहे. सायंकाळनंतर थंडीत आणखीच भर पडते. थंडीने सकाळी आणि रात्री शहरात लवकरच शुकशुकाट होऊ लागला आहे. यात गारपीट आणि वादळी पाऊस झाल्यास थंडीत आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे.

Image may contain: one or more people and outdoor

आला 'हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला

वातावरणाचा आता काहीही भरोसा राहिलेला नाही. उन्हाळ्यात पाऊस पडतो तर पावसाळा कोरडा जातो. त्यामुळे नेमका कोणता ऋतू सुरू आहे, असा प्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होतो. पावसामुळे हुडहुडी... वाढल्यामुळे ""आला "हिवसाळा', स्वेटर जॅकेटसह रेनकोटा घाला'' असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

Image may contain: 1 person, smiling, outdoor and closeup

 

अवश्य वाचा - मोठा आवाज अन्‌ धावाधाव, काय झाले असावे?

थंडीचा कडाका वाढणार

ढगाळ वातावरणानंतर पाऊस, गारठा, धुक्‍याची चादर अन्‌ शिमला व काश्‍मीरचा आल्हाददायक "फील' असाच काहीसा अनुभव नागपूरकर दोन ते तीन दिवसांपासून घेत आहे. शहरात पहाटेच्या सुमारास दमदार सरींनी हजेरी लावल्यानंतर दाट धुके पसरले होते. त्यामुळे वातावरण गारठले. विदर्भात पाऊस व ढगाळ वातावरण आणखी दोन ते तीन दिवस राहणार असून, त्यानंतर थंडीचा कडाका वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 

Image may contain: 1 person, motorcycle and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain again in Nagpur