कोरोनामुळे नागपुरातील आणखी `हे` परिसर सील

rameshvari, zingabai takli area seal
rameshvari, zingabai takli area seal

नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने रामेश्‍वरी, झिंगाबाई टाकळी, मिनीमातानगरातील काही परिसर प्रतिबंधित करण्याचे आदेश आज आयुक्तांनी काढले. सहा वस्त्यातील निर्बंध हटवित महापालिकेने नागरिकांना दिलासा दिला. 

लकडगंज झोनअंतर्गत प्रभाग 24 मधील मिनीमातानगरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्यामुळे येथील मनपा शाळेच्या उत्तरेस प्रदीप फुलझेले ते भगवान भोले यांचे घर, पूर्वेस प्रदीप फुलझेले ते मनपा शाळा भिंत, दक्षिणेस मनपा शाळा भिंत, पश्‍चिमेस भगवान भोले ते संत धासीदास भवन भिंतीपर्यंतचा परिसर सील करण्यात आला.

मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग 11 येथील झिंगाबाई टाकळीतील एसआरए इमारतीच्या दक्षिण-पश्‍चिमेस विनोद खरे यांचे घर, उत्तर-पश्‍चिमेस गोदावरी किराणा स्टोअर्स, उत्तर-पूर्वेस अनिल ढोले यांचे घर, दक्षिण-पूर्वेस खंडेश्वर यांचे घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला.

धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 33 मधील रामेश्‍वरीतील विलासनगरमध्ये उत्तर-पश्‍चिमेस राजो किराणा, उत्तर-पूर्वेस संजय सावरकर यांचे घर, दक्षिण-पूर्वेस नंदाजी महाराज मठ, उक्षिण-पश्‍चिमेस भिमराव राऊत यांच्या घरापर्यंत परिसरात निर्बंध लावण्यात आले.

आसीनगर झोनअंतर्गत प्रभाग 3 मधील विनोबा भावेनगर गल्ली नंबर 1 येथील दक्षिण-पूर्वेस यश मोबाईल शॉप, उत्तर-पूर्वेस दपीप नामदेव सुटे यांचे घर, उत्तर-पश्‍चिमेस शिवकुमार धकाते यांचे घर आणि दक्षिण-पश्‍चिमेस सेवा श्री बॅंक, क्वेटा कॉलनी, श्री स्वामी नारायण अपार्टमेंट येथील दक्षिण-पश्‍चिमेस न्य ईरा हॉस्पिटल, उत्तर-पश्‍चिमेस सायक्‍लोन बुटीक, उत्तर-पूर्वेस रिद्धी सिद्धी फास्ट फूड चाट पॉइंट तर दक्षिण-पूर्वेस तायबा टिंबर मार्ट, पांडे वस्ती गल्ली नंबर 6 येथील दक्षिण-पूर्वेस शिल्पा नंदू गायकवाड यांचे घर, उत्तरेस एस.एन.के. इंजिनिअरिंग, उत्तर-पश्‍चिमेस दिलीप गुप्ता यांचे घर तर दक्षिण-पश्‍चिमेस शब्बीर खान यांचे घरापर्यंतचा परिसर सील करण्यात आला.

गांधी झोन महालअंतर्गत प्रभाग 22 क्वेटा कॉलनी, श्रीस्वामी नारायण अपार्टमेंट तसेच इतवारी भाजी मंडी, जगदीश हलवाई या परिसरात निर्बंध लावण्यात आले. इतवारी भाजी मंडीतील जगदीश हलवाईच्या उत्तर-पश्‍चिमेस अनिकेत कलेक्‍शन, उत्तर-पूर्वेस चेरी फॅशन, दक्षिण-पूर्वेस सस्कार भवन आणि दक्षिण-पश्‍चिमेस पराग एजन्सीपर्यंत क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले. 

सतरंजीपुरा, बजाजनगर घेणार मोकळा श्‍वास 
पालिकेने आज कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने सतरंजीपुरा झोनमधील स्विपर कॉलनी लालगंज, विनाकी सोनार टोली, सतरंजीपुरा परिसरातील निर्बंध हटविले. याशिवाय लक्ष्मीनगर झोनमधील बजाजनगर, धंतोली झोनमधील चंद्रमणीनगर, धरमपेठ झोनमधील धंतोली एस. के. बॅनर्जी मार्ग परिसरही मोकळा केला. गांधीबाग कपडा मार्केट परिसरही मुक्त करण्यात आला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com