आठवण : नवबौद्धांच्या सवलतींचे प्रवर्तक रामविलास पासवान, दिली होती दीक्षाभूमीला भेट

Ramvilas Paswan had  visited Deekshabhoomi in 1990
Ramvilas Paswan had visited Deekshabhoomi in 1990

नागपूर  : १९९० सालची घटना. पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या मंत्रीमंडळात श्रम आणि कल्याण मंत्री म्हणून रामविलास पासवान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आले होते. यानंतर पासवान नागपुरात आले. त्यावेळी पासवान यांना नवबौद्धांची समस्या सांगण्यात आली होती, ती समस्या पासवान यांनी सोडविली. महाराष्टरातील ३५ लाख नवबौद्धांच्या सवलतीचा विषय रामविलास पासवान यांनी निकाली काढला होता.

दलितहित जपणारे पासवान यांचे निधन झाल्यानंतर दीक्षाभूमी भेटीसह पासवान यांच्या आठवणीना त्यांचे नागपुरातील कौटुंबिक सहकारी असलेले अनिल नगरारे यांनी उजाळा दिला. १९८९ साली देशात एक अभूतपुर्व क्रांती झाली होती. व्ही. पी. सिंग यांनी कॉंग्रेस सोडली आणि जनता दल स्थापन केले. जनता दलाला देशातील जनतेने पसंती दिली. भाजपाच्या मदतीने २ डिसेंबर १९८९ जनता दल सत्तेवर आले. सिंग मंत्रीमंडळ तयार झाले. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हे सरकार येणाऱ्या क्रांतीची चाहूल होती. 

ठळक बातमी - जेवताना पोळी कधी आणि किती खावी? जाणून घ्या आहारतज्ज्ञ डॉ. कविता गुप्ता यांच सल्ला
 

परंतु १० नोव्हेंबर १९९० या काळात एक वर्षापेक्षा कमी काळाच्या सरकारमध्ये पासवान यांची छाप देशावर होती. त्यांनी दलित हितासोबत ओबीसी हित जोपासले होते. मोठ्या प्रमाणात ओबीसी जनता दलासोबत जुळला होता. मंडलवादी व्ही. पी. सिंग यांनी १३ ऑगस्ट १९९० रोजी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली आणि देशभरात मंडलच्या विरोधात कमंडल यात्रा अर्थात रथयात्रा काढण्यात आली. 

ही रथयात्रा अडवल्याचे निमित्त करून सिंग यांचा पाठिंबा भाजपाने काढून घेतला. पासवान यानंतरही दलित चळवळीशी जुळून होते, घाटकोपर येथील रमाबाई हत्याकांडामध्ये भंडारा येथील आम्रपाली बनसोड शहीद झाली होती. त्यावेळी भंडारा येथे रामविलास पासवान यांनी भेट दिली. घाटकोपर दंगलीत ११ आंबेडकरी कार्यकर्ते शहीद झाले होते. त्यावेळी त्यानंतर मात्र पासवान यांनी भाजपाशी तडजोड केली. मात्र दलितांच्या मागण्यांप्रती त्यांची आत्मियता होती, हे मात्र निश्चित. घाटकोपर दंगलीती ११ शहीदांच्या नातेवाईकांना रेल्वेत पासवान यांनी नोकरी दिलयाची आठवण अनिल नगरारे यांनी सांगितली. नगरारे यांच्यासह मदन कुत्तरमारे हे पासवान यांच्या अतिशय जवळ होते, हे विशेष.

 
मामूजान म्हणणारे पासवान हरवले ः ॲड. कुंभारे

देशाचे केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. देशातील तमाम दलित बहुजन समाजाची हानी झाली. त्यांच्यासारखा अभ्यासू नेता हरवला. पासवान यांनी दीक्षाभूमीला भेट दिली, त्यानंतर त्यांनी कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथेही भेट दिली होती. येथील बुद्धमूर्तीसमोर ध्यान त्यांनी केले होते. प्रा. जोंगेंद्र कवाडे यांचे मित्र असल्याने मला पासवान मामूजान म्हणून बोलवत होते. त्यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाली आहे. नव बौद्धांच्या सवलतीचा विषय असो की, ओबीसी आरक्षणाचा विषय, त्यांनी अतिशय समर्थपणे हे विषय निकाली काढले होते, अशी शोकसंवेदना राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य ॲड.सुलेखा कुंभारे यांनी व्यक्त केली. 

संपादन  : अतुल मांगे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com