esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

refund expenses for online classes

मुलांच्या ऑनलाइन क्‍लासेसमुळे येणाऱ्या आर्थिक अडचणींवर अनोखा मार्ग काढत एका पालकाने त्याच्या पाल्यासाठी लॉकडाउनदरम्यान आलेल्या खर्चाचे विवरण शाळेला पाठवले. सध्या इंटरनेटवर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

वा रे पठ्ठे...शाळेलाच पाठवले ऑनलाइन क्लासेसचे बिल

sakal_logo
By
प्रशांत राॅय

नागपूर : मुलांच्या ऑनलाइन वर्गांसाठी वेगळा लॅपटॉप घेतला. शिवाय वीज आणि अमर्याद इंटरनेट डेटा वापर. विशेष म्हणजे मुलांसाठी नेत्ररोगतज्त्र आणि मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्याचीही वेळ आली. यासह इतर बाबींचा विचार करून सुमारे 89 हजार 500 रुपये खर्च आला आहे. तो मला साभार परत मिळावा असे खरमरीत, उपरोधिक पत्र एका पालकाने शाळेला पाठवून खुसखुशीत अंदाजात व्यथा मांडली आहे. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

कोरोनामुळे शाळा ऑनलाइन भरू लागल्या आहेत. मात्र, ही शिकवणी पालकांना सोपी राहिलेली नाही. मुलांच्या ऑनलाइन क्‍लासेसमुळे येणाऱ्या आर्थिक अडचणींवर अनोखा मार्ग काढत एका पालकाने त्याच्या पाल्यासाठी लॉकडाउनदरम्यान आलेल्या खर्चाचे विवरण शाळेला पाठवले. सध्या इंटरनेटवर ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

ती कुणी पाठवली याबद्दल निश्‍चित माहिती नाही. परंतु, नेहमीची शुल्कवाढ आणि यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळांकडून ऑनलाइन क्‍लासेसची सक्ती यामुळे विविध शाळेतील पालकांच्या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर या पोस्टला पसंत केले जात आहे. समाज माध्यमातही शेअर आणि फॉरवर्ड केले जात असून काहीही करून पालकांना कसे नागविले जाते याबद्दल जिव्हाळ्याने चर्चा होत आहे. 

शाळेसारखा "फिल' नाही 
माझ्यादृष्टीने कुठलीही कठीण समीकरणं समजावून सांगताना एखाद्या सॉफ्टवेअरपेक्षा फळा आणि खडू वापरणं आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणं महत्त्वाचे आहे. संगणकाचा, इंटरनेटचा उपयोग फार कठीण नाही. मात्र, त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण वर्गातच बसलो आहोत असं वाटत नाही. शाळेत असल्याची जी भावना असते ती राहत नाही. शिवाय सारखे मोबाईलकडे पाहून मुलांना डोळे, हात, पाठ यांचाही त्रास जाणवतो, असे पालक एम. एस. बावस्कर म्हणाल्या. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!  

आधीचा टीव्हीचे व्यसन आणि आता मोबाईलचे वेड यामुळे मुलांचे डोळे आणि एकूणच मानसिक स्वास्थ्य याविषयी सजग होण्याची आवश्‍यकता आहे. शाळांचा ऑनलाइन क्‍लासेसचा फंडा जरी एकादृष्टीने योग्य असला तरी मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या अंगानेही विचार व्हायला हवा. 
-डॉ. ए. के. पाल, मेडिकल ऑफिसर 

go to top