हुश्श! अखेर अकरावी प्रवेशासाठी नोंदणीची तारीख ठरली

registration for class 11 soon
registration for class 11 soon

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावीच्या प्रवेशासाठी 15 जुलैपासून विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना अर्जाचा पहिला टप्पा भरता येणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार असून, कागदपत्रेही ऑनलाइन तपासण्यात येणार आहेत. प्रक्रियेत शहरातील 190 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 58 हजार 240 जागांचा समावेश आहे. 

राज्यात करोनाचे सावट गडद असल्याने जुलैच्या शेवटी दहावीचा निकाल लावण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात येत आहे. त्यानुसार 23 जूनला शिक्षण विभागाने अकरावीचे पाच शहरांतील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे ठरविले आहे. त्यानुसार 1 जुलैपासून प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांना नोंदणी करायची आहे.

शिवाय अकरावीच्या जागा, माध्यम, शाखा, प्रवेश शुल्क आदींची माहिती महाविद्यालयांना द्यायची आहे. विशेष म्हणजे, कनिष्ठ महाविद्यालयांना ही माहिती देण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नसून शाळांना मोबाईलवरच माहिती पाठवायची आहे. यानंतर 15 जुलैपासून शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या नोंदणीस सुरुवात होईल. 

निकालानंतर दुसरा टप्पा 
केंद्रांवरून माहिती पुस्तकांच्या विक्रीची मुभा न देता, विद्यार्थ्यांना ऑनलाइन माहिती पुस्तिका बघून अर्ज भरावयाचा आहे. यासाठी ऑनलाइन शुल्कच भरावे लागणार आहे. केंद्रावर विद्यार्थ्यांना बघण्यासाठी केवळ पाच माहिती पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. साधारणत: दहावीचा निकाल लागल्यावर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत अपेक्षित असून निकालानंतर दुसऱ्या टप्प्यास सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. 

अशा आहेत तारखा 
1 ते 15 जुलै - कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी 
15 ते 16 - माहितीची तपासणी करणे 
15 जुलै - विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी 

एकूण जागा- 58,840 
केंद्रीय समितीमार्फत प्रवेश - 30,009 
आरक्षित जागांचे प्रवेश - 7,529 
एकूण प्रवेश - 37,558 
रिक्त जागा - 21,282 
प्रवेशाची टक्केवारी - 51.04 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com