पॉलिटेक्निक प्रवेश नोंदणीला पुन्हा मुदतवाढ; ५ डिसेंबरपर्यंत करता येणार नोंदणी

मंगेश गोमासे 
Thursday, 26 November 2020

२ डिसेंबरला अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख १७ हजार जागांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ९५ हजारांवर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. 

नागपूर,  ः मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे थांबलेली पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने प्रवेशासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले असून, ५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. तर, १२ डिसेंबरला अंतिम यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. राज्यातील १ लाख १७ हजार जागांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत ९५ हजारांवर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. 

सविस्तर वाचा - ऐटीत खरेदी करायला गेला पोलिसांची वर्दी; दुकानदाराला आला संशय आणि घडली जेलवारी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यावर्षी विद्यार्थ्यांना घरून अर्ज भरण्याची मुभा मिळाली. ९७ हजार विद्यार्थ्यांपैकी ७३ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्जनिश्चिती केली. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायालयात याचिका असल्याने प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली होती. आता सरकारने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी निर्णय घेतला आहे. 

४०, ४५ टक्क्यांवर मिळणार प्रवेश

राज्यात पॉलिटेक्निक, फार्मसी पदविका प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रमात इतर मागासवर्गीय आणि विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना आता ४० टक्के तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांवर प्रवेश मिळणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राजपत्र काढले आहे. 

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

राज्यात पॉलिटेक्निक आणि फार्मसीच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश नोंदणी सुरू आहे. यासाठी इतर मागासवर्गीय आणि विविध प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना ४५ तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्क्यांची अट ठेवण्यात आली होती. मात्र, या प्रकाराने बरेच विद्यार्थी पॉलिटेक्निकऐवजी पदवी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा. दुसरीकडे ४० टक्क्यांवर प्रवेश मिळत नसल्याने अनेकदा मुले तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मुकत असल्याचे दिसून येत होते.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Registration date for polytechnic admission extended again