हूश्श! त्या मृत पक्षांना बर्ड फ्लू नाही; तपासणी अहवाल आला निगेटीव्ह

निलेश डोये 
Thursday, 14 January 2021

काही भागात पक्षी मृत पावल्याच्या घटना समोर आल्या अशा ठिकाणी विशेष पाळत ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन अधिकारी युवराज केने यांनी सांगितले.

नागपूर : देशातील काही राज्यांमध्ये बर्ड फ्लू मुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण भागातही काही ठिकाणी पक्षांचा मृत्यू झाला. कोढाळी भागातील मृत पावलेले पोपट आणि कबुत्‍तरचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासना थोडासा दिलासा मिळाला. 

काही भागात पक्षी मृत पावल्याच्या घटना समोर आल्या अशा ठिकाणी विशेष पाळत ठेवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदचे पशुसंवर्धन अधिकारी युवराज केने यांनी सांगितले.

अधिक वाचा -  पानिपतावर जिंकण्यासाठी नव्हे तर तत्वासाठी लढले मराठे; पहिल्यांदाच उघड झालीत धारातीर्थी पडलेल्या सरदारांची नावं 

कोंढाळी या भागातील रिगणाबोंडी, मिनीवाडा, मसाळा, चाकगेडोह आदी भागात गेल्या काही दिवसांपासून पोपट, चिमण्या, कावळे, जंगली कबुतर आदी पक्ष्यांचा मोठ्या संख्येने अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याचे समोर आले. रिंगणाबोडी बोडी येथे झाडाखाली मृत पोपटांचा सडा पडलेला आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. प

क्ष्यांचा मृत्यू कशाने झाला, याबाबत चर्चांना उधाण आली आहे. मृत पाच पोपट आणि एका कबुत्तराचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. बर्ड फ्लू अहवाल निगेटिव्ह आला. तर कळमेश्वर तालुक्यातील उबगी येथील पोल्ट्री फार्ममधील २५० वर कोंबड्या मृत आढळल्या. तर दुसऱ्या फार्ममधील कोंबड्या मृत मिळाल्या.

जाणून घ्या - बहिण भावाला बोलवायला गेली, खिडकीतून दृश्य बघताच मोठ्यानं किंचाळली

 मौदा येथील एक व्यक्तीच्या शेतात कोंबड्या मरण पावल्याची घटना समोर आली. सर्वांचे नमुने तपासणी पाठविण्यात आले असून त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे केने यांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reports of birds are negative no Bird Flu to them in Nagpur