नागरिकांचा संताप अनावर; न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही

Resentment of citizens in Hinganghat
Resentment of citizens in Hinganghat

नागपूर : हिंगणघाटमधील पीडितेचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच सर्वत्र संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. दारोडा पसिरात संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-हैदराबाद महामार्ग बंद पाडला. यामुळे दोन किमीपर्यंत वाहनांची रांग लागली होती. संतप्त नागरिकांनी रोष व्यक्‍त करीत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी लावून धरली. आरोपीला शिक्षा झाली तरच मुलीच्या आत्म्याला शांती मिळले, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांसह गावकऱ्यांनी व्यक्‍त केली. न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतील आहे. आग पीडितेच्या मृत्युमुळे राज्यभरात तणाव निर्माण झाला आहे. 

वर्ध्यातील हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी सकाळी 6.55 निमिटांनी हृदयविकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला. तिच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालायात उपचार सुरू होता. सात दिवसांपासून तिची मृत्यूची झुंज सुरू होती. मात्र, दोन दिवसांपासून प्रकृती अधिकच खालावल्याने चिंता व्यक्‍त केली जात होती. अखेर तिची झुंज अपयशी ठरली व सोमवारी मृत्यू झाला. 

दरोडा गावातील नागरिकांना मुलीचा मृत्यू झाल्याचे समजताच चौका-चौकात बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठानही बंद ठेवण्यात आली. चौका-चौकात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जवळपास तीनशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. संतप्त नागरिकांनी एकत्र येत नारोबाजी केली. अंकिताला न्याय मिळालाच पाहीजे, आरोपीला कठोर शिक्ष झाली पाहीजे, "जाळून टाका जाळून टाका' अशा घोषणा संतप्त नागरिक देत होते. 

महामार्गावर लागल्या रांगा

संतप्त नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केल्यामुळे नागपूर-हैदराबाद महामार्गावर दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. सकाळी 11 वाजतापासून वाहतूक पूर्णपणे थप्प पडली आहे. चंद्रपूर व नागपूर येथील नागरिकांनी रोष व्यक्‍त करीत रास्तारोको केला. न्याय द्या, न्याय द्या अशी मागणी नागरिक करीत होते. 

पोलिस, नागरिकांमध्ये धक्‍काबुक्‍की

संतप्त नागरिक न्यायासाठी रस्त्यावर उतरल्यामुळे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, फाशी द्या, आरोपीला फासावर चढवा, जाळून टाका जाळून टाका अशा घोषणा देत संताप व्यक्‍त केला. नागरिकांची समजूत घालण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत नागरिकांची धक्‍काबुक्‍की झाली. यामुळेही काही काळ तणाव निर्माण झाला होता. हिंगणघाट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपीला आमच्या समोर जाळा

माझ्या मुलीचा सात दिवसांनी मृत्यू झाला. आता आरोपीला आमच्या ताब्यात द्या व आमच्या समोर जाळा. त्यालाला तशीही वेदना झाली पाहिती, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली. 

न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही

सरकारकडून योग्य ती मदत व आरोपीला फाशी मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली होती. यांनतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन करून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि भावाला नोकशी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, संतप्त गावकऱ्यांनी न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावात आणखीनच भर पडली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com