बेजार झालेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका; कशाच्या किमतीत झाली वाढ वाचा...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जून 2020

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 1 जूनपासून वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमतीमुळे देशातील गॅसच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. 
उपराजधानीत विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो) दरात 48 रुपयांची वाढ केली आहे.

नागपूर : कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन 5.0 जारी करण्यात आला आहे. यातच सर्वसामन्यांना आणखी एक झटका बसला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ जाहीर केली असून, शासनाकडून मिळणाऱ्या सबसीडीत तब्बल चार पट कपात केली आहे. 
एकीकडे कोरोनाचे संकट असताना आता सामान्य ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 1 जूनपासून वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किंमतीमुळे देशातील गॅसच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. 
उपराजधानीत विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो) दरात 48 रुपयांची वाढ केली आहे.

इंडियन ऑइलने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आधी या गॅस सिलिंडरची किंमत 589 रुपये होती. ती आता 635 रुपये प्रति सिलिंडर इतकी झाली आहे. एप्रिल 2020 पर्यंत 199 रुपये सबसिडी येत होती. जून महिन्यात 635 रूपयांच्या सिलेंडरची सबसीडी रक्कम चार पट कपात करीत, केवळ 35 रूपये झाली आहे.

सविस्तर वाचा - खाकी वर्दीतील लव्हबर्डची चर्चा जोरात, वरिष्ठांपर्यंत पोहोचले प्रकरण अन्...

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत झालेल्या दरवाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना जूनपर्यंत विनामूल्य गॅस सिलिंडर मिळेल. गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत घरगुती गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मार्च, एप्रिल महिन्याची सिलेंडर मिळाल्यानंतर उज्वलाच्या लाभार्थ्यांना तिसरे सिलेंडर देण्यात आलेले नाही. 

2020 मधील दरातील चढउतार     
महिना घरगुती गॅस सिलेंडरचे दर मिळालेली सबसिडीची रक्कम
जानेवारी 759 194 
फेब्रुवारी 904 329
मार्च 900 299
एप्रिल 789 199
मे 589 00
जून 637 35

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rise in the price of domestic gas cylinders from June one