संघ स्वयंसेवक करतोय कोरोनाशी दोन हात

Rss team volunteers active in twelve areas of Nagpur
Rss team volunteers active in twelve areas of Nagpur

नागपूर : कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या भारतात 21 दिवसांच्या संचारबंदीचे यशस्वी पालन होते आहे. अशात गरीब, गरजू आणि निराधार लोकांना अन्न सामग्री व जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात येत आहे. स्थानिक स्वयंसेवकांनी कंबर कसली असून, शहरातील गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. 

दोन दिवसांपूर्वी रामेश्‍वरची यात्रा आटोपून मदुरई निजामुद्दीन एक्‍सप्रेसने नागपुरात पोहोचलेले मिर्जापूर येथील 28 वयोवृद्ध नागपुरात अडकले. एर्नाकुलम एक्‍सप्रेसमध्ये ते बसणार होते; मात्र गाडीत प्रचंड गर्दी असल्याने ते गाडीत चढू शकले नाहीत. प्रारंभी रेल्वे प्रशासनाने त्यांना स्थानकातून हुसकावून लावले. भूक व तहानेने व्याकूळ झालेल्या या वृद्धांची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली अन्‌ शहरातील सामाजिक संस्थांनी रेल्वे स्टेशनकडे धाव घेतली. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीचे अभिषेक मिश्रा व रितेश पांडे यांनी त्यांच्या चहा नाश्‍ता व भोजनाची तर नवीन मिश्रा, अनुप पाटील व रितेश पिल्लेवार यांनी टवेरा गाड्यांची व्यवस्था करीत त्यांना मिर्जापुरकडे रवाना केले. कोरोना विरुद्ध लढताना संघाच्या सेवा विभागाची दुसरी झलक दिसली ती इतवारी भागात. मेयोतील कॅन्टिन चालविणाऱ्या संघ स्वयंसेवकला तेथील अडचणींची जाणीव झाली. त्याने तत्काळ सेवा विभागाशी संपर्क साधला अन्‌ पाण्याच्या बादल्या, हात धुण्यासाठी साबण व सॅनिटायझर मेयोत पोचत्या झाल्या. 

शहरात संचारबंदी असताना इतवारी भागातील स्वयंसेवकांचा हा सेवाभाव वाखाणण्यासारखा होता. अशी एक दोन नव्हे तर शहरात सुरू असलेल्या संघाच्या सेवा कार्याची अनेक उदाहरण देता येऊ शकतील. शहरात 12 भागांमध्ये संघाच्या सेवा विभागाने हे कार्य विभागले असून, 24/7 सहकार्य करू शकतील अशा तरुण स्वयंसेवकांची चमू तयार केली आहे. त्यांची नावे व संपर्क कसा साधावा याबाबत सोशल मीडियावर माहिती देण्यात येत आहे. कोणाला शिजलेले अन्न, कोणाला औषधे, कोणाला डाळ तांदूळ आणि जीवनावश्‍यक वस्तुंची गरज भासल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मदत करण्यात येत आहे. 

राष्ट्रसेविका समितीची स्वतंत्र रचना

मात्रृशक्‍ती अशी ओळख असलेल्या राष्ट्रसेविका समितीने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, धंतोलीतील अहल्या मंदिरातून हे मदतकार्य करण्यात येणार आहे. प्राथमिक स्तरावर शिजलेले अन्न देणे शक्‍य नसले तरी गहू, डाळ, तांदूळ आणि जीवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा समितीतर्फे करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com