धास्तावलेल्या श्रमिकांच्या भावनांशी खेळ! पसरली श्रमिक ट्रेनची अफवा; वेळीच स्थिती हाताळल्यानं टाळली गर्दी

rumors of Shramik train at Nagpur railway station
rumors of Shramik train at Nagpur railway station

नागपूर ः महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार असल्याच्या चर्चेने शनिवारी दुपारनंतर चांगलाच जोर धरला. त्याच वेळी मजुरांना सोडण्यासाठी श्रमिक एक्स्प्रेस सोडण्यात येणार असल्याची अफवा समाज माध्यमांवरून पसरली. त्यामुळे राज्यातील काही रेल्वेस्थानकांवर मजुरांनी गर्दी करण्यात सुरुवात केली. अखेर रेल्वे प्रशासनालाच समोर येऊन श्रमिक एक्स्प्रेसची चर्चा निव्वळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यात लॉकडाउनसंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्याच्याच आधारावर लॉकडाउन निश्चित असल्याची चर्चाही सुरू झाली. शनिवारी रात्रीपासूनच किमान महिन्याभराचा लॉकडाउन लागू शकेल, या शक्यतेने गत लॉकडाउनमध्ये गैरसोयींचा सामना करणाऱ्या मजुरांमध्ये कुजबूज सुरू झाली. 

त्यातच मध्य रेल्वेकडून मजुरांना सोडून देण्यासाठी श्रमिक ट्रेन सोडण्यात येत असल्याची अफवा सोशल मीडियावरून वाऱ्याच्या वेगात पसरत गेली. त्यासोबतच काही मजुरांची गावी परतण्यासाठी धावपळ सुरू झाली. काही रेल्वेस्थानकांवर मजुरांचे गर्दी करणे सुरू झाले. गत वर्षीचा अनुभव लक्षात घेत अप्रिय घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनालाच समोर यावे लागले. मध्य रेल्वेकडून कुठूनही श्रमिक ट्रेन सोडण्याचा निर्णय किंवा नियोजन झाले नसल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. 

रेल्वेकडून केवळ स्पेशल ट्रेन चालविण्यात येत असून कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच आत प्रवेश दिला जात आहे. इतरांना प्रवेशाची परवानगी नसल्याचेही रेल्वेने स्पष्ट केले. सततच्या लॉकडाउनमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या श्रमिकांनी पायीच गावाकडचा रस्ता धरला होता. मे महिन्यात अचानक देशभरात हे लोण पसरल्यानंतर रेल्वेकडून मजुरांच्या सुविधेसाठी श्रमिक ट्रेन सोडण्यात आले. नागपूर स्टेशनवरून एकूण १४ ट्रेन सोडण्यात आल्या होत्या.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com