मुख्यमंत्र्यांनी दाद दिलेल्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील  कर्मचाऱ्यांचे पगार थकले  

The Salaries of The Contract Labour at the Transit Treatment Center Struck Down
The Salaries of The Contract Labour at the Transit Treatment Center Struck Down


नागपूर, ता. २३ ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत कौतुक केलेल्या नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील कंत्राटी आणि स्थायी कर्मचाऱ्यांचा पगार तीन महिन्यांपासून थकलेला आहे. वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या हे कंत्राटी कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले असताना पगार थकल्याने त्यांना उपाशी पोटी दिवस काढण्याची वेळ आली आहे. 


सेमिनरी हिल येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आत्तापर्यंत शंभरपेक्षा अधिक वन्यजीवांसह पक्ष्यांचे जीव वाचले आहेत. त्यात या कंत्राटी कर्मचारी, पशुवैद्यक यांचा मोलाचा वाटा आहे. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यापासून तब्बल दोन महिने टाळेबंदी होती. तेव्हा हे कर्मचारी आरोग्याची काळजी घेत वन्यप्राण्यांसह पक्ष्यांच्या संरक्षणासाठी कायम दूरध्वनी आल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहोचत होते. त्यादरम्यान ५० पेक्षा अधिक पक्षी आणि वन्यप्राण्यांना पकडून त्यांना जंगलात मुक्त केले आहे. टाळेबंदीमुळे सर्वत्र शांतता असल्याने वन्यप्राणी गावांच्या शेजारी आणि गावात येत होते. तेव्हा मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी त्या वन्यप्राण्यांना जंगलाकडे यशस्वीरीत्या पाठविण्यासाठी यांचे सहकार्य घेतले जात होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत. त्यातील दहा ते बारा कर्मचारी कोरोनाबाधित आढळलेली आहेत. त्यामुळे ते घरी विश्रांती घेत आहेत. मात्र, घरात धान्य नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी अशी चिंता भेडसावू लागली आहे. तसेच या स्थितीत सकस आहार घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून केला जात असला तरी घरात धान्यच नसल्याने सकस आहार त्यांना कसा मिळेल, अशा प्रश्न उभा ठाकला आहे. 

मन सुन्न! चुली पेटल्याचं नाहीत; गावातील मुलांच्या बाबतीत घडलेली हृदयद्रावक घटना बघून हळहळले अख्खे गाव

कंत्राटी कर्मचारी असून २४ तास कामावर हजर आहेत. तरीही पगार होत नसल्याने त्यांची मनःस्थितीवर परिणाम झाला आहे. उपवनसंरक्षकांना थकीत पगाराबद्दल विचारणा करण्यासाठी मोबाईल लावला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे ट्रान्झिट सेंटरला उपवनसंरक्षकांनीच वाऱ्यावर सोडल्याचे बोलले जात आहे. मात्र, अनुत्पादक असलेल्या वनामृत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाकडे त्यांचा विशेष लगाव असल्याचे बोलले जात आहे. ते कशामुळे हे मात्र, गुलदस्त्यात आहे. 

नव्याने ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये रुजू झालेला वन परिक्षेत्र अधिकारीच गेल्या काही दिवसापासून सुटीवर असल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे त्याला अभय कोणाचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे कंत्राटी कामगारांचे जीव धोक्यात सापडलेले आहे. कॅम्पमधून या कर्मचाऱ्यांच्या पगाराची सोय केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना यश कथा सांगताना सेंटरचे यशोगाथा सांगायची आणि श्रेय लाटण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com