समीरची प्रेरणादायी काहाणी... अभ्यास धाकट्याचा, उत्तीर्ण झाला थोरला!

Sameer passed the administrative exam in the first attempt
Sameer passed the administrative exam in the first attempt

नागपूर : अनेकांना अभ्यासाची गोडी नसते. अभ्यास म्हटलं की जिवाकडे येते. यामुळे नुसते कारण सांगून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. काही तो नुसता अभ्यास कसा करू शकतो याचा विचार करीत असतात. यासाठी हातात पुस्तकही घेतात. एकदा हातात घेतलेले पुस्तक कधी त्याचा सोबती बनतो हे त्याला कळत नाही. यातूनच एक मोठा अधिकारी घडतो. असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी लागलेल्या यूपीएससीच्या परीक्षेच्या निकालात दिसून आला... 

समीर प्रकाश खोडे याचा लहान भाऊ प्रतीक खोडे हा गेल्या अनेक वर्षांपासून आयएएसची तयारी करीत आहे. त्यासाठी तो सतत सात ते आठ तास अभ्यास करीत असायचा. प्रतीक दिवत-रात्र अभ्यास कसा करू शकतो असा प्रश्न समीरला पडत होता. एक दिवस प्रतीक अभ्यास करीत असताना समीरने सहजच त्याचे पुस्तक घेत वाचण्यास सुरुवात केली. बघता बघता तो त्यात रमला. यानंतर तोही त्याच्यासोबत अभ्यास करू लागला.

यानंतर दोन्ही भाऊ सोबत अभ्यास करू लागले. प्रतीक समीरला अभ्यासात मार्गदर्शन करू लागला. त्याचे मार्गदर्शन आणि समीरची मेहनत यातूनच २०१८ साली त्याने प्रशासकीय सेवेची पूर्वपरीक्षा दिली. त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला. यानंतर मुलाखतीत यश मिळवले. विशेष म्हणजे यासाठी त्याने कुठल्याही प्रकारची शिकवणी लावली नाही. केवळ ऑनलाइन-टेस्ट-सीरीज देत परीक्षेत यश मिळवले. 

समीरने लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून केमिकल इंजिनिअरिंग आणि आयआयएम लखनौ येथून व्यवस्थापनाची पदवी मिळवली आहे. एका महिन्यानंतर नेमके त्याला कोणती श्रेणी मिळते हे कळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याला आयपीएस होण्याची आशा आहे. मात्र, प्रथम पर्याय आयएएस टाकले असल्याचे सांगितले. सेल्फ स्टडीच्या जोरावर काहीही मिळवता येणे शक्य होत असल्याचे समीरने सांगितले. 

धाकट्या भावाला यशाचे श्रेय

धाकटा भाऊ रोज तासन् तास अभ्यास करायचा. कुतूहल म्हणून त्याचे पुस्तक चाळले अन् अभ्यासाची गोडीच लागली. प्रथमच प्रशासकीय परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ऊत्तीर्ण केली. समीर प्रकाश खाडे याने ५५१ रँक मिळवला असून, अभ्यासाची प्रेरणा देणाऱ्या आपल्या धाकट्या भावाला यशाचे सर्व श्रेय दिले.

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com