नागपुरात दोन दिवस ‘मिनी लॉकडाऊन'; काय सुरू राहणार, काय बंद?

saturday and sunday mini lockdown in nagpur
saturday and sunday mini lockdown in nagpur

नागपूर  ः गेल्या तीन दिवसांपासून शहरात हजारांवर कोरोनाबाधित आढळून येत आहे. बाधितांच्या वाढत्या संख्येला रोखण्यासाठी व गर्दीवर नियंत्रण आणण्याकरिता उद्या शनिवार आणि रविवारी पूर्ण बाजारपेठांसह हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने बंद राहणार आहे. केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने तसेच हॉटेल, रेस्टॉरंटचे केवळ किचन सुरू राहणार असल्याने खवैय्यांना ऑनलाइन ऑर्डरद्वारे पदार्थ मागविता येणार आहे. पुढील दोन दिवस नागरिकांना ‘मिनी लॉकडाऊन'चीच अनुभूती येणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने प्रशासनात खळबळ माजली आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सोमवारपासून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था, आठवडी बाजार बंद करण्यात आले. याशिवाय धार्मिक, राजकीय सभा, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर ७ मार्चपर्यंत प्रतिबंध लावण्यात आली आहे. याशिवाय शनिवार व रविवारी, दोन दिवस बाजारपेठा बंद करण्याचे आदेशही जिल्हा व महापालिका प्रशासनाने काढले होते. 

त्यानुसार उद्यापासून दोन दिवस शहरवासींसह ग्रामीणमधील जनतेलाही घरातच कुटुंबीयांसोबत वेळ घालवावा लागणार आहे. उद्या आणि रविवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार बाजारपेठ बंद राहणार आहे. त्यामुळे इतवारी, महाल, सीताबर्डीसह सर्वच मोठ्या बाजारपेठा बंद राहणार आहे. याशिवाय दुकाने, मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, रेस्टॉरंट, हॉटेल, सरकारी, निमशासकीय कार्यालये, कत्तलखाने, मटण, चिकन शॉप बंद राहणार आहेत. 

त्यामुळे विकेंडला खाण्यासाठी तसेच खरेदीसाठी बाहेर जाण्याचा बेत आखणाऱ्यांची निराशा होणार आहे. परंतु खवैय्यांसाठी ऑनलाइन खाद्य पदार्थ पुरवठा सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंटचे केवळ किचन सुरू राहणार असल्याने खवय्यांना जिभेचे चोचले पुरविता येणार आहे.

आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नका
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे निर्बंध आवश्यक आहे. शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस प्रतिष्ठाने, कार्यालये, दुकाने बंद ठेवण्यात यावी. अति आवश्यक सेवा सुरू राहतील. आवश्यकतेशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये.
-राधाकृष्णन बी. आयुक्त, महापालिका

ग्रामीण भागातही बंदी
ग्रामीण भागातील रेस्टॉरंट, हॉटेल बंद करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनीही घराबाहेर पडण्याचा मोह टाळावा. अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू राहतील. परंतु अतिआवश्यकता असेल तरच बाहेर पडावे. दोन दिवस घरांमध्येच राहून कोरोनावर नियंत्रणासाठी सहकार्य करावे.
- रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी
 

दोन दिवस कुटुंबीयांसोबत

यानिमित्त अचानक बिझी झालेल्यांना दोन दिवस कुटुंबीयांसोबत घालविण्याची संधी मिळणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाने केलेल्या या उपाययोजनांमुळे पुन्हा एकदा कुटुंबीयांत संवाद रंगणार आहे.
 

हे सुरू राहील

दवाखाने, औषध दुकाने, भाजीपाला, फळे, दूध, वृत्तपत्र, पेट्रोल पंप, किराणा दुकान, ऑनलाइन खाद्य पदार्थ, बससेवा, ऑटो, टॅक्सी, खाजगी वाहतूक, बांधकामे, उद्योग, कारखाने.

हे बंद राहील

दुकाने, मॉल, बाजार, थिएटर, नाट्यगृह, उपाहारगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, सरकारी, निमशासकीय, खासगी कार्यालये, मनपाचे कत्तलखाने,
मटण, चिकन विक्रीची दुकाने. 
 

घरी राहून प्रशासनाला सहकार्य करा 
एक कोरोनाबाधीत व्यक्ती गर्दीत गेला तर २५ व्यक्तींना त्याचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे नियम पाळावे. नागरिकांनी घरी राहून मनपा प्रशासनाला सहकार्य करावे. नागरिक व प्रशासन मिळून कोरोनाला हद्दपार करू शकतो.
-दयाशंकर तिवारी, महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com