आश्चर्यच की, असा एक शिक्षक जो करतो कॉपीबहाद्दरांचे समर्थन... वाचा कारण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये गैरमार्गाचा प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी मोठी असते. यावर्षी राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळात 1200 हुन अधिक कॉपीची प्रकरणे आहेत. यामध्ये कोकण विभागात एकही प्रकरण नसून मराठवाड्यात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. नागपुरातही जवळपास शंभरावर कॉपीची प्रकरणे आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयामध्ये चौकशीसाठी उपस्थित राहावे लागते. येथे या विद्यार्थ्यांच्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते.

नागपूर : कोरोना काळात कॉपी प्रकरणात अडकलेल्या विद्यार्थ्यांवर कुठलीच कारवाई करू नये अशी अजब मागणी शिक्षक भारती या संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्राचार्य भाऊ पात्रे यांनी केल्याचे समजते. या अजब मागणीचे निवेदनही त्यांनी विभागीय अध्यक्षांना सादर करीत, कॉपीबहाद्दरांचे समर्थन केल्याचे दिसून येते. शिवाय शिक्षक अशाप्रकारे परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन करीत असल्याची चर्चा आता शैक्षणिक वर्तुळात होऊ लागली आहे.

दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये गैरमार्गाचा प्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी मोठी असते. यावर्षी राज्यातील नऊ विभागीय शिक्षण मंडळात 1200 हुन अधिक कॉपीची प्रकरणे आहेत. यामध्ये कोकण विभागात एकही प्रकरण नसून मराठवाड्यात सर्वाधिक कॉपीची प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. नागपुरातही जवळपास शंभरावर कॉपीची प्रकरणे आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयामध्ये चौकशीसाठी उपस्थित राहावे लागते. येथे या विद्यार्थ्यांच्या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाते.

हेही वाचा : ऑनलाईन शिक्षणाच्या सर्वेक्षणात झाले धक्कादायक खुलासे, नक्की वाचा ही बातमी...

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना नागपूर येथील विभागीय कार्यालयात उपस्थित राहणे शक्‍य नसल्याने नागपूर विभागीय मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये झालेल्या गैरमार्ग वापर प्रकरणांची चौकशी जिल्हास्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यामध्ये चौकशीसाठी तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, शिक्षक भारती संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्राचार्य भाऊ पात्रे यांनी शिक्षण मंडळाला निवेदन देत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईच करू नये अशी अजब मागणी केली आहे. या प्रकाराने शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधान आल्याने अशाप्रकारची मागणी म्हणजे परीक्षेतील गैरप्रकाराला समर्थनच असल्याचे मत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

असा दिला तर्क
गैरप्रकारात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यातूनच परीक्षेत यासह गैरप्रकार करणाऱ्या मुलांनी याआधी आत्महत्तेचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून यापुढे गैरप्रकार न करण्याचे हमीपत्र लिहून घेत कारवाई करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See who is supporting copy cheating ... Read