देशसेवेसाठी सैन्यदलात जाण्याची गरज नाही; समाजात राहून करा देशसेवा: शिवाली देशपांडे यांचे मत 

Serve for country by doing social works said shivali deshpande
Serve for country by doing social works said shivali deshpande

नागपूर : भारतात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त लोकं तरुण  आपल्या सर्वांनाच माहिती आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं वेळोवेळी आपली देशभक्ती सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी तरुणाईचा विशेष कल सैन्यामध्ये भरती होण्याकडे असतो. मात्र यावर फ्लाइट लेफ्टनंट (सेवानिवृत्त) शिवाली देशपांडे यांनी व्यक्त मत व्यक्त केलं आहे.  

देशसेवा करण्यासाठी सैन्यदलात सहभागी होण्याची काहीही आवश्यकता नाही. समाजात राहूनही सर्वसामान्य नागरिक विविध प्रकारे योगदान देऊन देशाची सेवा करू शकतो, असे मत फ्लाइट लेफ्टनंट (सेवानिवृत्त) शिवाली देशपांडे यांनी व्यक्त केले.

एस. बी. सिटी कॉलेजचा क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग व कामठीच्या एस. के. पोरवाल कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या, देशभक्तीची व्याख्या खूप मोठी आहे. केवळ सीमेवर लढणारा सैनिकच देशभक्ती किंवा देशसेवा करतो, असे म्हणणे चुकीचे आहे. 

प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने बहुमूल्य योगदान देऊन देशसेवा करू शकतो. सजग राहून पर्यावरणाची काळजी घेणे, अद्ययावत शिक्षण घेणे, दानधर्म करणे, निवडणुकीत योग्य नेता निवडणे, सरकारी नोकरी करणे, इतकेच नव्हे पुलवामा व उरीसारख्या घटनांबद्दल मत व्यक्त करणे, हेही देशसेवेचाच एक भाग आहे. 

त्या पुढे म्हणाल्या, देशभक्त माणसाला समाजाकडून नेहमीच आदर व प्रेम मिळाले आहे. हे केवळ त्यांनी केलेल्या त्यागामुळे नसून समर्पणवृत्ती व त्यांनी दाखविलेल्या देशप्रेमाबद्दल असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या हृदयात सदैव देशप्रेमाची भावना कायम ठेवणे आवश्यक आहे. प्रा. कल्पना मिश्रा यांनी संचालन केले. संयोजक डॉ. इंद्रजीत बासू यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी डॉ. संजय चौधरी, डॉ. राजेश अलोणे, डॉ. प्रशांत बांबळ, डॉ. जयंत रामटेके उपस्थित होते.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com