ढिम्म संकेतस्थळांमुळे पालकांना मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मागील वर्षी जिल्ह्यात 675 शाळांनी नोंदणी केली होती. तेव्हा जिल्ह्यासाठी 7 हजार 204 जागा राखीव करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 6 हजार 92 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. आज दुपारी 4 वाजतानंतर पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ सुरू झाले. मात्र, संकेतस्थळाच्या ढिम्मपणासोबतच अनेक तांत्रिक अडचणींमुळे पालकांना चांगलाच मनस्ताप झाला.

नागपूर : आरटीईअंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली. मात्र, संकेतस्थळाचा ढिम्मपणा व "लोकेशन'च उपलब्ध होत नसल्याने पालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
आरटीईअंतर्गत समाजातील गरीब, दुर्बल पालकांच्या विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये 25 टक्के राखीव ठेवण्यात येत आहे. या जागांवर नि:शुल्क प्रवेश दिला जातो. पालकांना 12 ते 29 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइनरीत्या अर्ज सादर करता येणार आहे.

अवश्य वाचा - काच फोडली, नस कापली...अन्‌ पुढे

मागील वर्षी जिल्ह्यात 675 शाळांनी नोंदणी केली होती. तेव्हा जिल्ह्यासाठी 7 हजार 204 जागा राखीव करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 6 हजार 92 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. आज दुपारी 4 वाजतानंतर पालकांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ सुरू झाले. मात्र, संकेतस्थळाच्या ढिम्मपणासोबतच अनेक तांत्रिक अडचणींमुळे पालकांना चांगलाच मनस्ताप झाला. यामुळे अनेकांचे अर्जही आज अपलोड झाले नाहीत. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायद्यांतर्गत 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यात 680 शाळांनी नोंदणी केली आहे. त्यानुसार 6 हजार 797 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत.

प्रवेशाकरिता ही कागदपत्रे गरजेची

प्रवेशासाठी सर्व विद्यार्थ्यांना पत्त्याचा पुरावा व जन्मदाखला आवश्‍यक आहे. या दोन कागदपत्रांसोबत एससी, एसटी, व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र (वडील किंवा विद्यार्थी यांचे) आवश्‍यक आहे. तर, खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पत्त्याचा पुरावा व जन्मतारीख दाखला आवश्‍यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना पत्त्याच्या पुरावा व जन्मतारीख दाखला यासोबतच सिव्हिल सर्जन यांचा दाखला आवश्‍यक आहे. एक लाखापेक्षा कमी उत्त्पन्न असल्याचा दाखला. अनाथ बालकांसाठी अनाथालयातील कागदपत्रे, जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात, त्यांचे हमीपत्र आवश्‍यक आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: server down;