सत्तर वर्षीय आजीने मेट्रोत साजरा केला वाढदिवस; ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ला पसंती

Seventy year old grandmother celebrated Metro birthday
Seventy year old grandmother celebrated Metro birthday

नागपूर : महामेट्रोने सुरू केलेल्या ‘सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या उपक्रमाला शहरवासींनी पसंती दिली आहे. आज वाढदिवसांचे दोन कार्यक्रम धावत्या मेट्रोत साजरे करण्यात आले. यात सत्तर वर्षीय आजीनेही मेट्रोत वाढदिवस साजरा करण्याचा आनंद लुटला.

महामेट्रोच्या प्रत्येकच उपक्रमाला नागपूरकरांनी डोक्यावर घेतले आहे. धावत्या मेट्रोत वाढदिवस व इतर समारंभ साजरा करण्यासाठी महामेट्रोने सेलिब्रेशन ऑन व्हील्स हा उपक्रम सुरू केला. आज दोन कार्यक्रम पार पडले. यात हिंगणा मार्गावरील मेट्रोत ७० वर्षीय आजीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सरस्वती हिराणी असे नाव असलेल्या आजीने त्यांच्यासाठी हा प्रसंग अविस्मरणीय व आश्चर्यकारक ठरल्याचे सांगितले.

कुटुंबीयांनी दिलेल्या आश्चर्याच्या धक्‍क्याने भारावल्याचे त्या म्हणाल्या. एवढेच नव्हे, तर आज त्यांचा पहिलाच मेट्रो प्रवास होता. या उपक्रमासाठी त्यांनी मेट्रोचेही आभार मानले. वर्धा मार्गावरील मेट्रोमध्ये वैभव शिंपी यांनी मुलीचा वाढदिवस साजरा केला. महामेट्रोच्‍या या संकल्पनेमुळे आनंदाचा वेगळाच रंग अनुभवायला मिळत असल्याचे वैभव शिंपी म्हणाले.

एका तासासाठी तीन हजार

ही योजना सर्वांसाठीसाठी खुली असून, नागरिकांप्रमाणे इव्हेंट कंपन्याही याचा लाभ घेऊ शकतात. तीन कोचच्या मेट्रोमध्ये कोरोना पार्श्वभूमीमुळे जास्तीत जास्त १५० व्यक्तींना आमंत्रित करता येईल. नागरिकांना एका तासासाठी तीन हजार मोजावे लागतील. यापेक्षा अतिरिक्त वेळ लागल्यास नागरिकांना प्रती तास दोन हजार रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

सात दिवसांपूर्वी मेट्रोची बुकिंग

नागरिकांच्या या पैशातून समारंभासाठी मेट्रो कोचला आकर्षक पद्धतीने सजविण्यात येईल. याशिवाय नागरिकांच्या समारंभात मेट्रोतर्फे ‘वेलकम अनाउन्समेंट’ करण्यात येणार आहे. मेट्रोतर्फे समारंभादरम्यान कर्मचारीही पुरविण्यात येईल. याशिवाय फोटो, व्हिडिओग्राफीलाही मुभा राहणार आहे. विशेष म्हणजे, कार्यक्रमासाठी सात दिवसांपूर्वी मेट्रोची बुकिंग मेट्रो भवन येथे करावी लागणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com