प्र-कुलगुरू, अधिष्ठाता पदासाठी शिक्षण मंचला पात्रताधारक सापडेना

मंगेश गोमासे
Friday, 16 October 2020

डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा ८ एप्रिलला सेवाकाळ संपल्यानतर माजी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे आणि चारही अधिष्ठातांच्या पदाचा कार्यकाळ संपला. ८ ऑगस्टला नव्या कुलगुरूंनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या नियुक्तीनंतर किमान महिनाभरात तरी या पदांवर योग्य व्यक्तीची निवड होणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे सहा महिन्यांच्या टाळेबंदीमुळे विद्यापीठातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. याशिवाय करोना संकटाच्या काळात अंतिम वर्षाच्या परीक्षांची मोठी जबाबदारी विद्यापीठावर आहे. अशा काळातही विद्यापीठाच्या परीक्षांचा संपूर्ण भार हा परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांवर आहे. मुळात प्र-कुलगुरू आणि अधिष्ठातांची परीक्षेच्या नियोजनात मोठी मदत होत असते. मात्र, ही पदे रिक्त असल्याने विद्यापीठातील अनेक कामे खोळंबली आहेत

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. सुभाष चौधरी यांनी पदभार स्वीकारून दोन महिन्यांहून अधिक कालावधी लोटून आहे. मात्र, अद्यापही प्र-कुलगुरू आणि अधिष्ठातांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे कुलगुरू हे विद्यापीठ शिक्षण मंचाशी संबंधित असल्याने सध्या मंचाकडे वरील पदांसाठी आवश्यक पात्रताधारकांचा तुटवडा असल्याने ही पदे रिक्त असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात रंगली आहे.

एकत्र आले तरी नेटवर्क मिळेना, व्होडाफोन आयडीयाच्या नेटवर्कचा विद्यापीठाच्या परीक्षांना फटका

डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांचा ८ एप्रिलला सेवाकाळ संपल्यानतर माजी प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे आणि चारही अधिष्ठातांच्या पदाचा कार्यकाळ संपला. ८ ऑगस्टला नव्या कुलगुरूंनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यांच्या नियुक्तीनंतर किमान महिनाभरात तरी या पदांवर योग्य व्यक्तीची निवड होणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे सहा महिन्यांच्या टाळेबंदीमुळे विद्यापीठातील अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. याशिवाय करोना संकटाच्या काळात अंतिम वर्षाच्या परीक्षांची मोठी जबाबदारी विद्यापीठावर आहे. अशा काळातही विद्यापीठाच्या परीक्षांचा संपूर्ण भार हा परीक्षा व मूल्यांकन मंडळाच्या संचालकांवर आहे. मुळात प्र-कुलगुरू आणि अधिष्ठातांची परीक्षेच्या नियोजनात मोठी मदत होत असते. मात्र, ही पदे रिक्त असल्याने विद्यापीठातील अनेक कामे खोळंबली आहेत.

कुलगुरू डॉ. चौधरी हे शिक्षण मंचाशी संबंधित आहेत. त्यांच्या नियुक्तीनंतर मंचाने केलेला गवगवा सर्वश्रुत आहे. त्यामुळे प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता पदासाठी मंचाच्या व्यक्तीची निवड होण्याचा प्राधान्य दिले जात आहे. यासाठी विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्राचार्य व विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागातील प्राध्यापकांच्या पात्रतांची चाचपणी केली जात आहे. मात्र, शिक्षण मंचाच्या विचारधारेशी जुळलेले पात्रताधारक प्राध्यापक मिळत नसल्याने अद्यापही कुणाची निवड करण्यात आलेली नाही अशी चर्चा विद्यापीठात सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shikshan manch did not find any qualifiers for the post of Pro Vice-Chancellor and Deans