वाचा.. श्रावणात मंदिर कुलूपबंद

Shiva Temple Locked
Shiva Temple Locked

नागपूर :  सलग साडे चार महिन्यापासून देव भक्तांच्या, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. भक्त उपवास करुन घराघरांत ओम नमः शिवायचा जप करत भाविकांनी भगवान शंकराची आराधना करतात. पहिल्या सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्यात आले. श्रावणातील पहिला सोमवारी शिवमंदिर कुलूपबंद असल्याने प्रथमच अनेकांना घरीच पुजेचा साज मांडला होता. 

श्रावण महिन्यात शिव शंकराची आराधना केली जाते. यानिमित्ताने महालमधील कल्याणेश्‍वर, तेलंगखेडी, बर्डीसह शहरातील विविध भागातील मंदीरात दरवर्षी श्रावणात भाविकांची मोठी गर्दी असते. धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. यंदा मात्र कोरोनाने सगळ्यांना भीतीच्या छायेत बंदिस्त केले आहे. मंदिरे बंद आहेत, लोकांना देवदर्शनासाठी देखील जाता येत नाही.

सोन विकत घेण्यासाठी पहा सोनेरी स्वप्न; सोने @ 54 हजार 400 रुपये, वाचा सविस्तर...
बाहेर संसर्गाची भीती. देव भक्तांच्या प्रतीक्षेत, तर भक्त कोरोनाचे संकट दूर होण्याची प्रतीक्षा करत आहेत. देवाची आराधना करण्यासाठी मंदिरात जाता आले नाही, त्यामुळे शहरातील नागरिकांनी घरातील शिवलिंगाचे पूजन केले. अभिषेक, वस्त्र माळ, धूप आरती करून शिवशंकराचा जाप करण्यात आला. पहिल्या सोमवारी शिवमूठ म्हणून तांदूळ वाहण्यात आले. कोरोनाचे संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. दिवसभर व्रतस्थ राहून रात्री नैवेद्य दाखवून उपवास सोडण्यात आला. शहरातील तेलंगखेडी, कल्याणेश्‍वर, भोंडा महादेव, शिवमंदीर मोहन नगर, त्रिमूर्ती नगरसह विविध शिव मंदिरांत सकाळी विधिवत पूजा करून मंदिर बंद करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com