शिवसेनेच्या या खासदाराने केले स्वत:ला "होम क्वारंटाईन"

shivsena
shivsena

नागपूर : कोरोनाचा संसर्ग झालेली बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिच्या संपर्कात आलेले भाजप खासदार दुष्यंतसिंह संसदेतही उपस्थित राहिल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कोरोनाची दहशत देशाच्या कायदेमंडळापर्यंत पोहोचली आहे. येथूनच महाराष्ट्रातील एका शिवसेना खासदाराला लागण झाल्याची शक्यता निर्माण झाल्याने त्यांनी स्वत:ला "होम क्वारंटाईन" केले आहे.

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पुत्र असलेले दुष्यंतसिंह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटले होते. लखनौ येथे मागील आठवड्यात रविवारी गायिका कनिकाने मेजवानी आयोजित केली होती. या पार्टीत बडे राजकीय नेते, सनदी अधिकारी उपस्थित होते. वसुंधरा राजे, लोकसभा खासदार दुष्यंतसिंह हेदेखील या पार्टीत सहभागी झाल्या होत्या.

कनिका कपूर कोरोना विषाणू संक्रमित असल्याचे आढळून आल्यानंतर या पार्टीतील उपस्थितांकडे संशयाची सुई वळली असून, दुष्यंतसिंह यांच्या सहभागाच्या माहितीनंतर खळबळ निर्माण झाली आहे. दुष्यंतसिंह त्वरित विलगीकरण कक्षात गेले आहेत. मात्र त्याआधी त्यांनी दोन दिवस संसदेत उपस्थिती लावली होती. 

संसद भवनात आणि मध्यवर्ती कक्षातही (सेंट्रल हॉल) दुष्यंतसिंह हे अन्य खासदारांना भेटले होते. लोकसभेमध्ये दुष्यंतसिंह यांच्या शेजारी बसणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही चिंता व्यक्त करताना दुष्यंतसिंह स्वेच्छेने विलगीकरण कक्षात गेल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांची देखील दुष्यंतसिंह यांच्याशी भेट झाली होती. त्यामुळे तुमाने यांनी स्वत:ला "होम क्वारंटाईन" केले आहे. या वृत्ताला त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दुजोरा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com