मुलीला अभ्यास करताना झाला श्वसनाचा त्रास, रॅपिड टेस्ट आली निगेटिव्ह; तरी घरासमोर लागला फलक, वाचा

A sign was put up in front of the house without informing the family
A sign was put up in front of the house without informing the family

टेकाडी (जि. नागपूर) : गाव कांद्री... दिवस शनिवार... येथील १६ वर्षीय मुलगी घरी अभ्यास करीत होती... अचानक तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला... वडिलांनी तिला तात्काळ कांद्री स्थित कोविड केअर येथे नेले... तिची ऑक्सिजन लेव्हल सामान्य होती... कुटुंबाने खबरदारी म्हणून रॅपिड टेस्ट करून घेतली... जी निगेटिव्ह आली... आणि सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला... मात्र, पुढे जे घडले ते आश्चर्य चकीत करण्यासारखे आहे...

कोरोना संसर्गाच्या उदयापासून ते संसर्गाने थैमान मांडलेल्या स्थितीत कोरोना संदर्भात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान शासन, प्रशासनातर्फे मोठ्याने केले जात आहे. परंतु, सध्या कोरोनाचा वाढता उद्रेक बघता प्रशासन जनतेला सहकार्य करीत नसल्याचे दिसत आहे. कांद्री कोविड केंद्रात आर्टिफिशिआर कोरोना तपासणी केल्याचा अहवाल बाधित आल्यानंतरही संबंधित कुटुंबाला प्रशासनातर्फे सांगण्यात आले नाही.

सोमवारी पोलिसांच्या बंदोबस्तात थेट प्रतींबधित क्षेत्र असा फलकच घरी पोहेचल्याने ‘चाचण्या तुम्ही कराल पण अहवाल आम्हाला सांगणार कोण’ असा सवाल कुटुंबीयांनी केला. यावरून प्रशासन कोरोना संदर्भात किती सजग आहे हे लक्षात येते.

आम्हाला अजून मुलगी बाधित असल्याची माहिती न मिळाल्याने कुटुंबाने फलक न लावण्याची ताकीद दिली. यामुळे कर्मचारी परतले. मात्र, तब्बल तासाभरातच पोलिसांच्या सोबतीने घरी पोहेचून फलक लावले. यामुळे परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुटुंबाने खबरदारी म्हणून मुलीची रॅपिड टेस्ट करून घेतली. ती निगेटिव्ह आली. तरीही कुटुंबाने मुलीची आर्टिफिशिआर टेस्ट केली. तिला रात्री उशिरा उपचारासाठी नागपूरच्या खासगी रुग्णालयात आणले. स्थिती सामान्य असल्याने तिला घरूनच उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, सोमवारी सकाळी पुन्हा कुटुंबाने मुलीला नागपूर येथे उपचारासाठी नेले.

आर्टिफिसीआर चाचणीचा अहवाल २४ तासात प्राप्त होतो. प्रशासनाकडून बाधित व्यक्तीची माहिती कुटुंबाला अहवाल प्राप्त होताच कळवीने गरजेचे असताना सांगण्यात आले नाही. सध्या मुलीची स्थिती सामान्य आणि सुधारित असली तरी कोरोना संदर्भात तालुका, आरोग्य आणि स्थानीय प्रशासनाचा समन्वय दिसून येत नाही, हे मात्र नक्की...

अद्याप कुणी काहीच सांगितले नाही

शनिवारी आम्ही तपासणी करून घेतली. रविवारी आणि सोमवारी दिवसभर कुणीच काही सांगितले नाही. सोमवारी सायंकाळी पोलिसांचा फोनच आला. आम्ही मुलीला घेऊन रुग्णालयातच होतो. बाधित आल्यानंतर आता पुढे काय करायचं यासाठी देखील अद्याप कुणी काहीच सांगितले नाही. मंगळवारी आशा वर्करचा फोन आला फक्त. त्यांनी कुणाला सर्दी खोकला ताप आहे का फक्त याची माहिती घेतली, असे बाधित मुलच्या वडिलांनी सांगितले.

सुटीवर असल्याने कदाचीत हा गोंधळ
शनिवारला मुलीची चाचणी केली होती. रविवारी अहवाल प्राप्त झाला. मात्र, मी सुटीवर असल्याने कदाचीत हा गोंधळ झाला असावा. सोमवारी सकाळी १० वाजता रितसर बीडीओ यांच्याकडे अहवाल पाठविला आहे. स्थानिक प्रशासनाला ते सूचित करतात.
- डॉ. योगेश चौधरी,
आरोग्य अधिकारी, कन्हान

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com