नागपुरातील नामांकित बिल्डरची सहा लाखांनी फसवणूक, गुन्हा दाखल

six lakh rupees fraud with builder amit gadge in nagpur
six lakh rupees fraud with builder amit gadge in nagpur

नागपूर : शहरातील नामांकित बिल्डर आणि डेव्हलपर्स प्रफुल्ल गाडगे यांच्या मुलाची एका अ‌ॅल्युमिनियम व्यापाऱ्याने ६ लाख ३१ हजार रुपयांनी फसवणूक केली. त्यांच्या तक्रारीनुसार धंतोली पोलिसांनी व्यापारी मुकेश शहा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  प्रफुल्ल गाडगे यांचा मुलगा अमितचे नागपुरातील सुभेदार लेआऊट येथील अ‌ॅलुकोहॅब येथे प्रसाद प्रा. लि. चे ऑफीस आहे,  तर धंतोली हद्दीत वर्कींग ऑफीस आहे. अ‍ॅलुकोहॅब प्रसाद प्रा. लि. ला अ‍ॅबकॉन इन्फ्रास्टक्चर लि. कंपनीकडून छत्रपतीनगर मेट्रो टेशनचे काम मिळाले आहे. त्या कामासाठी आवश्यक असलेले अ‍ॅल्युमिनिअम प्रियांश गैरील (बोरीवली पश्चीम, मुंबई)चे संचालक मुकेश शहा यांच्या कंपनीकडून विकत घेण्याचे ठरविले. यासाठी अ‍ॅलुकोहॅब प्रसाद प्रा. लि. चे दुसरे संचालक अथर्व मोरोणे यांच्याकडून ५ लाख रुपये अ‍ॅडव्हांस घेण्यासाठी प्रियांश गैरीलचे प्रोप्रायटर मुकेश शहा ४ ऑक्टोबर २०१९ रोजी नागपूरला आले होते.

यावेळी त्यांनी स्वत:ला अधिकृत व्यापारी असल्याचे सांगून अमित गाडगे यांचा विश्वास संपादन केला आणि छत्रपतीनगर मेट्रो स्टेशनच्या कामासाठी आवश्यक असलेले चांगल्या दर्जाचे अ‍ॅल्युमिनिअम देतो असे आश्वासन दिले. त्यासाठी शहा याने दिलेल्या महावीरनगर, कांदीवली येथील कोटक महेंद्रा बँकेच्या शाखेत अमित गाडगे यांनी धंतोलीच्या अ‍ॅक्सीस बँकेच्या खात्यातून ६ लाख ३१ हजार रुपये वळते केले. तरीही शहा याने १ नोव्हेंबर २०२० पर्यंत कोणत्याही प्रकारे अ‍ॅल्युमिनियमचा पुरवठा केला नाही व प्रतिसादही दिला नाही. शहा याने मिळालेल्या रकमेचा गैरव्यवहार करून अ‍ॅल्यमिनिअमचा पुरवठा न करता फसवणूक केल्याप्रकरणी गाडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी विरोधात गुन्हा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com