अभियांत्रिकीतील भयानक वास्तव : पाच वर्षांत घटल्या सहा लाख जागा; विद्यार्थी संख्येतही लक्षणीय घट

Six lakh vacancies in five years in engineering
Six lakh vacancies in five years in engineering

नागपूर : तंत्रज्ञानात सातत्याने वाढ होत असली तरी, त्यामागे असलेल्या अभियांत्रिकीच्या पदवीला दिवसेंदिवस वाईट दिवस येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर, पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या सहा लाखांवर जागा घटल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे.

देशात दहा वर्षांपूर्वी अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्याची स्पर्धा लागली होती. बहुतांश हुशार विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शाखेत नोकरी करुन गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळविण्यावर भर असायचा. या आकर्षणामुळेच मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांची वाढ झाल्याचे दिसून आले. मात्र, गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होऊ लागला आहे.

याचा परिणाम प्रवेशावर झाल्याने महाविद्यालयांनी गेल्या पाच वर्षांत महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या जागा कमी करण्याचे ठरविले. त्यामुळे २०२०-२१ या वर्षापर्यंत अभियांत्रिकी शाखेतील तब्बल ६ लाख ५५ हजार ३९६ जागा घटल्या आहेत. विशेष म्हणजे पाच वर्षांपूर्वी देशातील तीस लाखांवर असलेल्या जागा थेट २४ लाखांवर आलेल्या आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानात प्रगतीची आस धरणाऱ्या देशासाठी धोक्याची घंटा म्हणता येईल.

ही आहेत कारणे

अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांची संख्या घटण्याची अनेक कारणे आहेत. महाविद्यालयांत सोयी-सुविधा नसणे, नावीन्यपूर्ण अभ्यासक्रमाची कमतरता, पुरेशा प्लेसमेंटचा अभाव आणि हमखास नोकरीच्या हमीचा अभाव आणि  महाविद्यालयांच्या संख्येत झालेली वाढ या कारणांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.  

दृष्टीक्षेपात आकडेवारी 

वर्ष अभियांत्रिकीच्या घटलेल्या जागा
२०१५-१६ ३०,९३,४२६
२०१६-१७ २९,९९,१३८
२०१७-१८ २५,७०,६८८
२०१८-१९ २७,११,८७८
२०१९-२० २५,४१,१५२
२०२०-२१ २४,४०,०३०

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com