अबब...इतकी गर्दी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ

bank
bank

नागपूर :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रोजगार नसलेल्या गोरगरिबांसाठी प्रत्येकी 500 रुपयांची मदत सलग तीन महिने केंद्र सरकारद्वारे दिली जाणार आहे. ते पैसे काढण्यासाठी दोन दिवसांच्या सुटीनंतर मंगळवारी बॅंकांमध्ये नागरिकांनी गर्दी केली. गर्दीतील नागरिकांना वारंवार विनंती करूनही बहुतांश ठिकाणी "सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात होता.
गर्दीमुळे प्रशासनही वैतागले असले तरी अनेक बँकांमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी बँकांच्या बाहेर रकाने केलेले नाहीत. या गर्दीत नियमितपणे दर महिन्याला सुरुवातीला निवृत्तिवेतन घेण्यासाठी येणाऱ्यांचीही मोठी संख्या होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उद्योग-व्यवसाय बंद आहेत. रोजंदारीवर काम करून उत्पन्न मिळविणाऱ्यांचे हाल सुरू आहेत. अशा स्थितीत गरिबांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सलग तीन महिने प्रत्येकी 500 रुपये दिले जाणार आहेत. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन खाती उघडण्याबाबत केलेल्या आवाहनानंतर सर्व बँकांतून शून्य बॅलन्स असलेली खाती उघडली आहेत. यापैकी शेतकऱ्यांच्या काही खात्यांतून पंतप्रधान किसान योजनेंतर्गत दर चार महिन्यांना दोन हजारांप्रमाणे सहा हजार रुपये जमा झाले आहेत. आता गरीब कल्याण योजनेंतर्गत प्रत्येकी 500 रुपये जमा होणार आहेत. नागपूर जिल्ह्यातील 24 पेक्षा अधिक व्यापारी बॅंकांच्या 500 पेक्षा अधिक शाखा व जिल्हा सहकारी बॅंकेच्या 250 पेक्षा शाखा मिळून एकूण 750 पेक्षा अधिक शाखांतील जनधन खात्यांत पैसे जमा झाले आहेत व त्यांचे वितरण शुक्रवारपासून सुरू झाले आहे. हे पैसे घेण्यासाठी बहुतांश शाखांतून गर्दी झाली होती.
सविस्तर वाचा - खाणीत पकडत होता मासे अचानक जाळ्यात अडकला पाय...मग
"एटीएमचा वापर करा'
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी अनुदान घोषित करण्यात आले. ही रक्कम वितरणास सुरुवात झाली. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या प्रधानमंत्री जनधन खात्यात ठरावीक रक्‍कम जमा केली जात आहे. लाभार्थ्यांनी रक्‍कम काढण्यासाठी बॅंकेत एकाचवेळी गर्दी करू नये. ज्यांना शक्‍य आहे, त्यांनी "एटीएम'द्वारे रक्कम काढावी, असे आवाहन बॅंकेकडून करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com