कोरोनाला हरविण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, ग्राहक-विक्रेत्यांमध्ये लक्षमणरेषा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

महापालिका प्रशासनाने काही दुकानादारांना ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी त्यांना सुरक्षित अंतरावर उभे करण्याचे निर्देश दिले आहेत. काही दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने 'सोशल डिस्टन्सिंग' पाळणे सुरू केले आहे. ग्राहक व दुकानदारांत किमान तीन फूटाच्या अंतरासाठी दुकानांबाहेर टेबल आदी लावले जात आहेत. यात आता दुकानांपुढे चुन्याने गोल निशाण केले जात आहे.

नागपूर : कोरोनापासून संरक्षणासाठी 'सोशल डिस्टन्सिंग'चा मंत्र दुकानदारांनीही आत्मसात केल्याचे चित्र आहे. अनेक दुकानांपुढे सुरक्षित अंतराचे गोल निशाण दिसून येत आहे. नागरिकही दोन ते तीन फूटावर तयार केलेल्या या गोलमध्ये रांगेत उभे राहत असल्याने दुकानेही आता 'सोशल डिस्टन्सिंग'ची प्रसार केंद्रे ठरत आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी दोन व्यक्तिंमध्ये किमान तीन फूटांचे अंतर आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. एवढेच नव्हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही नागरिकांना आवाहन करताना वारंवार 'सोशल डिस्टन्सिंग'वर भर दिला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने काही दुकानादारांना ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी त्यांना सुरक्षित अंतरावर उभे करण्याचे निर्देश दिले आहेत. काही दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने 'सोशल डिस्टन्सिंग' पाळणे सुरू केले आहे. ग्राहक व दुकानदारांत किमान तीन फूटाच्या अंतरासाठी दुकानांबाहेर टेबल आदी लावले जात आहेत. यात आता दुकानांपुढे चुन्याने गोल निशाण केले जात आहे. त्यामुळे आता दुकानांसमोरील गर्दी कमी होत आहेत. केवळ किराणाच नव्हे तर डेअरी, डेली निड्‌स, भाजी विक्रेते, फळ विक्रेत्यांच्या दुकानांपुढेही चुन्याचे गोल निशाण दिसून येत आहे. त्यामुळे नागरिक शिस्तीत उभे असलेले दिसतात. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दुकानदारांनी ही पाऊले आधीच उचलायला हवी होती, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

सविस्तर वाचा - अकरा विदेशींना ठेवले होम क्वॉरेंटाइनमध्ये! पोलिसांनी छापा टाकून घेतले ताब्यात

'अत्यावश्‍यक सेवेतील दुकानदारांनी धडा घ्यावा'
शहरातील काही भागात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दुकानांपुढे असे गोल निशान केले. काही दुकानदारांनी स्वतःहून पाऊल उचलले. मात्र, अनेक दुकानांत अद्यापही गर्दी होत आहे. त्यमुळे अत्यावश्‍यक सेवेतील सर्वच दुकानदारांनी 'सोशल डिस्टन्सिंग'चा धडा घ्यावा, अशी मागणी आता स्वतः नागरिकही करीत आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social distncing to fight corona