कोरोनाबाधित आढळून आल्याने उपराजधानीतील आणखी `हे` परिसर प्रतिबंधित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 जुलै 2020

उपराजधानीत कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे.

नागपूर : कोरोनाबाधित आढळून आल्याने धंतोली झोनमधील सुयोग अपार्टमेंट, मनीषनगर तसेच आशीनगर झोनमधील रिपब्लिकननगर क्रमांक दोन तसेच लक्ष्मीनगर झोनमधील लोकसेवानगरातील काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला. मात्र, कोरोनाबाधित रुग्ण न आढळल्याने नारा रोडवरील निर्मल कॉलनी व आर्यनगरातील नागरिकांना महापालिकेने दिलासा दिला. 

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होत आहे. धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 35 मधील सुयोग अपार्टमेंटचा संपूर्ण परिसर सिल करण्यात आला. याच प्रभागातील मनीषनगरातील जयदुर्गा सोसायटीतील दक्षिण पश्‍चिमेस चिंतामण दिक्षित यांचे घर, दक्षिण पूर्वेस निरज नाखले यांचे घर, उत्तर पूर्वेस पुरुषोत्तम राऊत यांचे घर, उत्तर पश्‍चिमेस धाबे यांचे घरापर्यंतच्या परिसरात निर्बंध लावण्यात आले.

आशीनगर झोनअंतर्गत प्रभाग 2 मधील रिपब्लिकननगर-2 मधील त्रिकोणी परिसराच्या उत्तर पश्‍चिमेस विजय चंद्रिकापुरे यांचे घर, उत्तर पूर्वेस येलला येंबेश्‍वर यांचे घर, दक्षिण पूर्वेस रणजित गायकवाड यांचे घर, दक्षिण पश्‍चिमेस चिमनकर यांचे घरापर्यंत निर्बंध लावण्यात आले. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 36 मधील लोकसेवानगरातील परिसरही प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला.

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

यात लोकसेवानगरातील पूर्वेस मोकळा भूखंड ते डॉ. मिनाक्षी जोशी यांचे घर, उत्तरेस राधिक गर्ल्स होस्टल ते मोकळा भूखंड, पश्‍चिमेस रस्ता व हेमंत लांडगे यांचे घर, दक्षिणेस हेमंत कातुरे ते डॉ. मिनाक्षी जोशी यांचे घरापर्यंतचा परिसर सिल करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी झोनअंतर्गत नारा रोडवरील निर्मल कॉलनीतील प्रतिबंधित क्षेत्रात घट करण्यात आली. याशिवाय याच परिसरातील आर्यनगरातील नागरिकांनाही दिलासा देण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: some part in Manishnagar, Loksevanagar area Restricted