अंथरुणावर खिळलेल्या रुग्णांची शुश्रूषा करणार अत्याधुनिक बेड

Sophisticated beds will take care of bedridden patients
Sophisticated beds will take care of bedridden patients

नागपूर : असाध्य आजाराने ग्रासलेले अनेक रुग्ण अंथरुणाला खिळतात. यामुळे त्यांच्या सेवेत सातत्याने एक व्यक्ती शुश्रूषा करण्यासाठी ठेवावा लागतो. मात्र, रुग्णाची सेवा करताना बेडवरील अंथरूण बदलणे आणि इतर क्रिया करण्यासाठी हलवावे लागते. मात्र, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेत यांत्रिकी शाखेत पीएच.डी. करणाऱ्याने अशा रुग्णांसाठी असा अत्याधुनिक बेड तयार केला आहे. ज्यामुळे रुग्णाला न हलविता सर्व क्रिया पार पाडता येणे शक्य होणार आहे.

अनेकदा मोठा आजार, अपघात आणि इतर कारणाने रुग्ण अंथरुणाला खिळतात. या रुग्णांची शुश्रूषा करणे बरीच अवघड गोष्ट असते. अनेकदा रुग्ण जास्त वेळ अंथरुणाला खिळल्याने ‘बेडसोल’ सारख्या समस्या निर्माण होत असते. त्यामुळे या रुग्णांची चादर नियमित बदलने, त्यांचा कड बदलण्याची नितांत आवश्यकता असते. ही बाब विचारात घेऊन व्हीएनआयटीच्या यांत्रिकी विभागाचे डॉ. अतुल अंधारे यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. करणाऱ्या अनिल ओंकार या विद्यार्थ्यांने ‘बेड व्हीथ कमोड साईड टिलरिंग’ची संकल्पना मांडली.

अनिल ओंकार मुळचे फर्निचर व्यावसायिक आहेत. त्यांनी स्क्रु, नट आणि इतर मेकॅनिझमचा उपयोग करून हा बेड तयार केला आहे. विशेष म्हणजे या बेडमध्ये ‘कमोड अटॅच’ करण्यात आलेला आहे. या कमोडला फ्लशिंगची सोय करण्यात आली आहे.

रुग्णाच्या क्रिया आटोपल्यावर कमोड दिसू नये अशा पद्धतीने ‘ॲडजस्ट’ करण्यात आले आहे. रुग्णाला आपली कुस बदलता यावी यासाठीही वेगळे मेकॅनिझम विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णाला बराच आराम मिळेल आणि ‘बेडसोल’ यासारख्या समस्या निर्माण होणार नाही.

रुग्णांची सेवा करणाऱ्यांसाठी उपयोगी
रुग्णांसाठी हा बेड अतिशय फायदेशीर आणि आरामदायी ठरेल. तसेच रुग्णांची सेवा करणाऱ्यांसाठी उपयोगी राहील. 
- डॉ. अतुल अंधारे,
प्राध्यापक, यांत्रिकी विभाग, विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com