खर्च आवरा...बचत वाढवा

Spending Cost ... Increase Savings
Spending Cost ... Increase Savings

नागपूर : विदेशी गुंतवणूकीमुळे शिक्षण क्षेत्रात सुधारणा होण्याऐवजी नुकसान होणार असल्याचे सांगून शिक्षण क्षेत्रातील विदेशी गुंतवणूकीला स्वदेशी जागरण मंचाचा विरोध आहे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठाचे प्रा. व स्वदेशी जागरण मंचाचे अखिल भारतीय सहसंयोजक डॉ. अश्‍वनी महाजन यांनी े केले.

नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि स्वदेशी जागरण मंचातर्फे सिव्हील लाईन्स येथील सभागृहात "वर्तमान आर्थिक परिस्थिती' या स्थितीवर ते बोलत होते. यावेळी चेंबरचे अध्यक्ष अश्‍विन मेहाडिया, कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, स्वदेशी जागरण मंचाचे राष्ट्रीय संयोजक अजय पत्की, कोषाध्यक्ष सचिन पुनियानी, किशोर धाराशिवकर, उपाध्यक्ष संजय अग्रवाल, सचिव रामअवतार तोतला उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, आपल्या देशात बचतीची परपंरा अनेक वर्षापासूनची आजही कायम आहे. पुढेही बचत संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यामुळेच सरकारने कर प्रणालीत काही पर्याय दिले असले तरी त्यात बचतीवर भर द्यावा असेही आवाहन केले. देशाचा विकास संसाधनाच्या आधारावर होणार आहे. पुर्वीच्या सरकारने मुक्त अर्थव्यवस्थेचा स्विकार केला. त्यामुळे आयात वाढली परिणामी, देशांतर्गत उत्पादन घटले आणि विदेशी व्यापार वाढला. आता केंद्र सरकारकडून नवीन मुक्त व्यापारावर निर्बंध आणले जात आहे. त्यामुळेच देशांतर्गत व्यापाराला प्रोत्साहन मिळू लागले आहे. केंद्र सरकारने 2020-21 च्या अर्थसंकल्पात मत्सपालन, बागायती आणि अन्य गैरकृषी कार्याच्या माध्यमातून ग्रामीण रोजगाराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बी.सी. भरतीया म्हणाले, स्वदेशी जागरण मंचचा मुख्य उद्देश स्वदेशी व्यापार आणि संस्कृती वाचविणे आहे. स्वदेशी व्यावसायात वाढ झाल्यास देशांतर्गत व्यवसायात वाढ होणार आहे. अश्‍विन मेहाडिया यांनी प्रास्ताविक केले. संचालन रामअवतार तोतला यांनी तर आभार राजू माखिजा यांनी मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com