आयुक्त तुकाराम मुंढेंवरून `या` पक्षात दुफळी...वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

एकीकडे सभागृहाबाहेर आयुक्तांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी तर सभागृहात आयुक्तांचा कडाडून विरोध झाला.

नागपूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा रेशिमबाग येथील सुरेश भट सभागृहात पार पडली. यावेळी सभागृहाबाहेर युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव व नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात शहर युवक कॉंग्रेसने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी केलेल्या उपाययोजना, शहरात हॉस्पिटलची निर्मिती आदी कामे केल्याचे नमुद करीत शेळके यांच्या नेतृत्त्वात 'तुकाराम मुंढे आगे बढो अशा घोषणा दिल्या. त्याचवेळी सभागृहात कॉंग्रेसचे नगरसेवक हरीश ग्वालंवशी यांनी केटीनगर मॉलचे रुपांतर हॉस्पिटलमध्ये केल्याने आयुक्तांवर गंभीर आरोप केले.

त्यांच्या या प्रश्‍नावरून सर्वच सदस्यांनी आयुक्तांची कोंडी केली. एवढेच नव्हे कॉंग्रेसचे आणखी एक सदस्य संजय महाकाळकर यांनी महापौरांना आयुक्तांविरोधात अविश्‍वास मांडण्याचे पत्रच दिले. एकीकडे एका नगरसेवकाकडून सभागृहाबाहेर आयुक्तांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी तर सभागृहात ग्वालवंशी, महाकाळकर यांच्याकडून आयुक्तांचा कडाडून विरोध झाला.

आतापर्यंत कॉंग्रेसमध्ये नेत्यांच्या गटबाजीमुळे दुफळी शहरवासींनी बघितली. आता अधिकाऱ्यावरून दुफळी निर्माण झाल्याचे शहरवासी बघत आहेत. विशेष म्हणजे आयुक्तांनी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे तसेच नगरसेवक नितीन साठवणे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यामुळे विकास ठाकरे यांनी आयुक्तांची बदली करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले. 

झाड केले कमी उंच, फळे झाली टंच!   

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यप्रणालीविरुद्ध कॉंग्रेसचे सदस्य संजय महाकाळकर यांनी आज महापौरांना अविश्‍वास ठराव मांडण्यासंदर्भात पत्र दिले. मात्र, त्याचवेळी कॉंग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वातील युवक कॉंग्रेसने सभागृहाबाहेर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरून कॉंग्रेसमध्येच दुफळी निर्माण झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A split in the Congress over Commissioner Tukaram Munde