गरजेनुसार धावणार बसेस; एसटी महामंडळाने केले नियोजन  

ST buses running as needed Planning done
ST buses running as needed Planning done

नागपूर  ः वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शासन व जिल्हा प्रशासनाने उपराजधानीत शनिवार व मर्यादित स्वरूपाच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने एसटी महामंडळानेही नियोजन केले आहे. प्रवासी संख्या कमी राहणार असल्याने निम्म्याच फेऱ्या चालविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. पण, बसस्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी जादा बसेस तयार राहतील. गरज पडल्यास या बसेसही सोडण्यात येतील.

शनिवार व रविवारी बाजारपेठा, आस्थापने, कार्यालये सारेच बंद राहणार आहे. सोबतच नागरिकांनाही घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे दोन्ही दिवस प्रवासी संख्या निश्चितच मोजकी राहील. यामुळे नियमित फेऱ्यांच्या तुलनेत अर्ध्याच फेऱ्या चालविण्याची तयारी करण्यात आली आहे. 

तथापि, चालक- वाहकांसह जादा बसेस बसस्थानकांवर तयार राहतील. सकाळच्या सत्रात अधिकाधिक फेऱ्या होतील. दुपारच्या सत्रात २२-२३ प्रवासी असणाऱ्या मार्गांवर फेऱ्या सोडल्या जातील. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यादृष्टीने रात्रीच्या नियमित फेऱ्या सोडण्यात येतीलच, अशी माहिती विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे यांनी दिली.

रविवार ‘परीक्षेचा’

आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेअंतर्गत रविवारी पेपर घेतला जाणार आहे. नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर हे एकमेव केंद्र असून, पावणे दोनशे केंद्रांवर परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील उमेदवारांना अडचणी येऊ नयेत या दृष्टीने तयारी पूर्ण ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून सर्व आगार व्यवस्थापकांना आवश्यक तयारी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमुख बसस्थानकांवर जादा बसेस तयार असतील. पेपर संपल्यानंतरही गर्दी होणार नाही याची काळजी घेत फेऱ्या सोडल्या जातील.

पर्यटन विशेष बस बंद

नागपूर विभागाकडून पर्यटन विशेष बस चालविण्यात येत आहे. परंतु, येणाऱ्या रविवारची फेरी रद्द करण्यात आली आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमिवर यावेळच्या फेरीचे बुकिंगच घेण्यात आले नाही.

अमरावती, अकोला बायपास

अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा या शहरांमध्ये रविवारी बसेस जाणार नाही. या शहरांच्या मार्गे पुढे जाणाऱ्या बसेस नियोजित वेळेनुसार धावतील. पण, त्या बायपास मार्गेच पुढे जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com