esakal | ..अन्‌ थांबविला "त्या' मुलीचा विवाह, काय होते कारण...
sakal

बोलून बातमी शोधा

काटोल  : पोलिस विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष व चाइल्डलाइन यांचे संयुक्त पथक.

दोन्ही कुटुंबात पाहुण्यांची, खर्चाची यादी तयार करण्यात येत होती. नव-या मुलासाठी लागणारे कपडे लत्ते खरेदी, मुलीसाठी सोन्याचे दागिणे तयार करण्यात येत होते. दोन्ही कुटुंबात आनंदी आनंद होता. परंतु घडले वेगळेच.

..अन्‌ थांबविला "त्या' मुलीचा विवाह, काय होते कारण...

sakal_logo
By
सतिश डहाट

कामठी (जि.नागपूर) : 21 जुलैला ठरलेल्या लग्नाची तयारी सुरू होती. सामाजिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. दोन्ही कुटुंबात पाहुण्यांची, खर्चाची यादी तयार करण्यात येत होती. नव-या मुलासाठी लागणारे कपडे लत्ते खरेदी, मुलीसाठी सोन्याचे दागिणे तयार करण्यात येत होते. दोन्ही कुटुंबात आनंदी आनंद होता. परंतु घडले वेगळेच. चाइल्ड लाइनला ही कुणकुण लागली. जिल्हा बाल संरक्षणकक्ष व जुने कामठी पोलिस ठाण्याच्या मदतीने मुलीच्या आईवडिलाचे समुपदेशन करून विवाह न थांबविण्याचा सल्ला देण्यात आला.

अधिक वाचा : मोबाईलच्या कारणावरून आई रागावल्याने मुलाची आत्महत्या...

प्रतिबंधक कारवाही करण्याचे दिले आदेश
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार 18 वर्षापेक्षा कमी व 21वर्षापेक्षा वयाने कमी असलेल्या अल्पवयीन मुलांचे विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. "चाइल्डलाइन'ला कामठी शहरातील जे. पी. नगर, मोदी पडाव येथे एका 14 वर्षीय मुलीचा बालविवाह होणार आहे, याबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली. चाइल्डलाइनने याबाबत माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाही करण्याचे आदेश दिले.

अधिक वाचा :आता प्रवाशांना बेड रोल, कोरोना प्रतिबंधक किटही, या स्थानकावर केली सुविधा...

संरक्षण, काळजीकरिता जिल्हा बाल संरक्षण अधिका-यांना पत्र
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण, संरक्षण अधिकारी विनोद शेंडे, अनुप देशमुख, चाइल्डलाइनच्या समन्वयिका छाया गुरव, चाइल्डलाइन टीमच्या सारिका बारापत्रे, पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटारे, पोलिस कर्मचारी पंकज भारसिंगे, तंगराजन पिल्ले, अंगणवाडी सेविका स्मृती दहाट यांनी या कामी सहभाग घेतला. बालविवाह होणाऱ्या अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती समक्ष काळजी व संरक्षणाची काळजीकरिता जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण यांनी पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांना पत्र दिले.

हेही वाचा : तुम्ही नव्हे तर पब्जी खेळतोय तुमच्या जीवाशी, नागपुरात उघडकीस आली ही घटना...

लग्नाची तयारी सुरू होती धूमधडाक्‍यात
जुनी कामठी पोलिस विभाग, जिल्हा बालसंरक्षण कक्ष व चाइल्डलाइन यांच्या पथकाने लग्न घरी भेट दिली व माहिती जाणून घेऊन मुलीच्या कागदपत्रावरून मुलीचे वय 14 वर्षे अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. लग्न 21जुलैला नागपूरच्या एका 26वर्षीय युवकांशी आयोजित केले होते. लग्नपत्रिकाही वाटप करण्यात आल्या होत्या. घटनास्थळी अंगणवाडी सेविकांना बोलाविण्यात आले. मुलगी शिकत असलेल्या शाळेत जाऊन मुलगी अल्पवयीन असल्याची खातरजमा करून मुलीच्या आईवडिलांचे समुपदेशन करून मुलीचे वय विवाहयोग्य झाल्याशिवाय विवाह करणार नाही, याचे हमीपत्र घेण्यात आले व होणारा बालविवाह थांबविण्यात आला. गुरुवारी मुलगी नागपूरला आपल्या नातेवाइकाकडे गेली असल्यामुळे उद्या शुक्रवारी मुलीचे समुपदेशन करण्यात येणार आहे.


संपादन
विजयकुमार राउत