Video : तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ नागपूरकर उतरले रस्त्यावर; व्युई वाँट मुंढे

नीलेश डाखोरे
Friday, 11 September 2020

या वादात मोठ मोठ्या नेत्यांनी उडा घेतल्याने चांगलाच संघर्ष नार्माण झाला होता. सत्ताधारी विरुद्ध मुंढे असा संघर्ष पाहायला मिळाला. हा वाद तुकाराम मुंढे यांची बदली करून शांत झाला. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. शुक्रवारी मुंढे जाणार असल्याचे समजताच चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी कोली होती.

नागपूर : कडक, शिस्तप्रिय अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांची अखेर बदली झाली. महापालिकेतील अधिकाऱ्यांशी झालेला वाद यासाठी कारणीभूत ठरला. तुकाराम मुंढे मुंबईसाठी निघण्यापूर्वी चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर चांगली गर्दी केली होती. तुकाराम मुंढे आगे बढो हम तुम्हारे साथ है. मनपा अधिकारी कैसा हो, तुकाराम मुंढे जैसा हो, व्युई वाँट मुंढे आदी आदी नारे त्यांच्या समर्थकांकडून देण्यात येत होते.

मनपा आयुक्त म्हणून कोरोनावर नियंत्रणाच्या प्रयत्नात असताना राज्य सरकारने २६ ऑगस्टला त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिवपदी केली होती. अचानक बदली झाल्याने त्यांना तसेच नागपूरकरांनाही धक्का बसला होता. तत्पूर्वी, २४ ऑगस्टला त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ते नागपुरातच होते. त्यांनी पुन्हा चाचणी केल्यानंतर कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. शुक्रवारी सहपरिवार नागपूरहून ते मुंबईला खासगी वाहनाने रवाना झाले.

अधिक माहितीसाठी - कुंभ मेळा संपल्यानंतर नागा साधू कोठे जातात? 

त्यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी झालेली बदली रद्द झाल्याचे वृत्त नागपुरात पोहोचले. मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदाचा कार्यभार देत राज्य सरकारने मुंढे यांची बदली रद्द केली.

मुंढे यांना अद्याप कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. परंतु, त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदावर बदली झाल्याने मुंढे निराश होते, असे समजते. अखेर राज्य सरकारने त्यांना दिलासा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्त्वाची बातमी - संतापजनक प्रकार! शेत दाखवण्याच्या बहाण्याने महिलेवर सामूहिक अत्याचार; तिघांना अटक एक पसार

तुकाराम मुंढे जाणार असल्याने त्यांच्या समर्थनार्थ नागपूरकर आक्रमक झाले होते. माजी आयुक्त मुंढे यांच्या घराबाहेर लोकांची चांगलीच गर्दी केली होती. सात महिन्यांपार्वीच मुंढे यांची नागपुरात बदली झाली होती. मात्र, सत्ताधारी भाजपशी त्यांचे कधीही जमले नाही. वेळोवेळी वाद होत गेला. महापौर संदीप जोशी यांच्याशी त्यांचा चांगलाच संघर्ष झाला.

या वादात मोठ मोठ्या नेत्यांनी उडा घेतल्याने चांगलाच संघर्ष नार्माण झाला होता. सत्ताधारी विरुद्ध मुंढे असा संघर्ष पाहायला मिळाला. हा वाद तुकाराम मुंढे यांची बदली करून शांत झाला. यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. शुक्रवारी मुंढे जाणार असल्याचे समजताच चाहत्यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी कोली होती.

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..

नागपुरातच बदलीची चर्चा

तुकाराम मुंढे यांची बदली रद्द झाल्याचे वृत्त येताच शहरवासींत उत्सुकता निर्माण झाली. ते पुन्हा आयुक्तपदी येणार, अशी चर्चा रंगली. अनेकांनी एकमेकांना फोन करून मुंढे आयुक्तपदी परत येणार काय? अशी विचारणा केली. अनेकांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही फोन करून विचारणा केली. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी ते आता जाणार नाही, पण आयुक्तपदीही येणार नसल्याचे कळताच अनेकांची निराशा झाली.

बदली झाल्याने मुंढेही समाधानी नव्हते

पंधरा दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तपदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी बदली झालेले तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ते नागपुरातच राहणार अशी चर्चा रंगली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात बदली झाल्याने मुंढेही समाधानी नव्हते. त्यांना मोठ्या जबाबदारीची अपेक्षा होती, असे समजते. त्यामुळे अखेर त्यांच्या मनासारखे झाल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात रंगली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On the streets of Nagpur in support of Tukaram Mundhe