विद्यार्थ्यांना मिळेल ऑनलाईन गुणपत्रिका व पदवी, वाचा कसे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या "ई-रिफॉर्म्स'च्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतचा कार्यक्रम सुरू झाला होता. यासंदर्भात एनएसडीएल व सीडीएल या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत प्रशासनाचे बोलणे झाले होते व त्यांचे सादरीकरणदेखील झाले होते. आयोगाने या दोघांपैकी कुणाशीही सामंजस्य करार करण्याची सूट दिली होती. विद्यापीठाने 2017 मध्ये "एनएसडीएल' सामंजस्य करार होता. मात्र, केंद्र सरकारने हा करार रद्द केला आहे. आता "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी आणि गुणपत्रिका बघता येणार आहे.

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदवी आणि गुणपत्रिकांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. याबाबत युजीसीने देशभरातील सर्वच विद्यापीठांना निर्देश दिले आहे. यामुळे "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रे बघता येणे शक्‍य होणार आहे.

देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत यासाठी केंद्र शासनाने "एनएडी' (नॅशनल ऍकेडमीक डिपॉझिटरी) यांच्यासोबत सेवा सुरू करण्याची घोषणा केली.

वर्ष लोटूनही रखडली विद्यापीठांमधील पदभरती?, ही आहेत कारणे...

राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या "ई-रिफॉर्म्स'च्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतचा कार्यक्रम सुरू झाला होता. यासंदर्भात एनएसडीएल व सीडीएल या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत प्रशासनाचे बोलणे झाले होते व त्यांचे सादरीकरणदेखील झाले होते. आयोगाने या दोघांपैकी कुणाशीही सामंजस्य करार करण्याची सूट दिली होती. विद्यापीठाने 2017 मध्ये "एनएसडीएल' सामंजस्य करार होता. मात्र, केंद्र सरकारने हा करार रद्द केला आहे. आता "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी आणि गुणपत्रिका बघता येणार आहे.

दोन वर्षांपासून थंडबस्त्यात
2017 मध्ये विद्यापीठाद्वारे "एनएसडीएल' सोबत करार केला होता. त्यात 2007 पासूनच्या कागदपत्रे डिजिटल करण्यास सुरुवात झाली होती. एक वर्ष हे काम सुरू केल्यानंतर हे काम थंडबस्त्यात पडले. याबाबत प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नसल्याचेही समजते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students will get Online Degree & Marksheet ... Read