आई-वडील गेले, बहिणीनेही मृत्यूला कवटाळले, एकाकीपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या  

Wednesday, 16 September 2020

धर्मेंद्र धनजल अविवाहित होता. तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्याच्या आई आणि वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काहीच दिवसांत त्याच्या तरुण बहिणीनेही इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो एकटाच राहत होता. 

नागपूर : एकटेपणा खूप वाईट असतो. आपल्या आप्तांचे एकाएकी निघून जाणे अनेकांना जगणे असह्य करते. त्यातल्या त्यात ते जर जन्मदाते असतील तर माणूस निराशेच्या खाईत लोटला जातो. मनाला चटका लावणारी अशीच एक घटना नागपुरात उघडकीस आली.   

आई-वडिलांचा मृत्यू झाला... त्यानंतर बहिणीचा आधार म्हणून खंबीरपणे उभा राहिलो... पण बहिणीनेही इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली... तेव्हापासून घरात एकटा जीवन व्यतित करीत आहे... आता मी जीवनाला कंटाळलो... मला जीवन नकोसे झाले आहे...त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे... अशी सुसाईड नोट लिहून एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. धर्मेंद्र पालसिंग धनजल (३७, भोसलेवाडी, लष्करीबाग) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. 

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..
 

धर्मेंद्र धनजल अविवाहित होता. तो खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्याच्या आई आणि वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काहीच दिवसांत त्याच्या तरुण बहिणीनेही इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. तेव्हापासून तो एकटाच राहत होता. 

एकाकी जीवनाला तो कंटाळला होता. त्यामुळे तो नेहमी नैराश्‍यात राहत होता. त्याने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी, त्याने सुसाईड नोट लिहून आत्महत्येचे कारण लिहिले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 
 

अशी आली घटना उघडकीस

धर्मेंद्र गेल्या दोन दिवसांपासून कामावर न आल्याने त्याच्या सहकारी ड्रायव्हरने मित्राने कॉल केला. फोन उचलत नसल्यामुळे तो थेट घरी आला. दार आतून लावलेले होते. त्याने आवाज दिला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने खिडकीतून डोकावून बघितले. तो गळफास  लावलेल्या अवस्थेत आढळून आला.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of a lonely young man, hangover to the ceiling fan