
हिवाळ्यात पहाटेच्या वेळी रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या रुग्णांना जोखमीचा सामना करावा लागतो. रक्तदाब वाढला की, नाडीचा वेग वाढण्याची भीती आहे. हिवाळ्यात रक्तातील प्लेटलेट्स नसांना चिटकून असतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. यावरील उपाय सांगताना डॉ. खंडाईत यांनी धुम्रपान व तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच व्यायाम करण्याचा सल्ला दिला
नागपूर : दिवाळी संपली की, थंडीची चाहूल लागते. डिसेंबर महिना संपत आला की थंडीची तीव्रता वाढते. पुढे संक्रांतीपर्यंत थंडीचा कडाका वाढत जातो. हवेतील बदलाचा परिणाम आरोग्यावर होतो. अलीकडे पाऊस आणि थंडी असा दुहेरी आघात होत असल्यामुळे कडाक्याची थंडी आहे. थंडीच्या दिवसात पहाटे पहाटे हृदयविकार तसेच पक्षघाताचा झटका येण्याची मोठी जोखीम आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विनोद खंडाईत, सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रवीण शिंगाडे यांनी दै. "सकाळ'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा - तुम्ही प्रेमीयुगुल आहात अन् प्रायव्हसी हवी आहे?, मोबईल आहे ना...
थंडीचे दिवस साऱ्यांनाच आवडतात. परंतु, या दिवसातील आरोग्याचे धोके समजून घेणे आवश्यक असल्याचे डॉ. खंडाईत म्हणाले. दिवसाचे कमाल तापमान 8 ते 10 अंशापर्यंत वर सरकत आहे. मात्र, रात्रीपासून पहाटेपर्यंत थंडीचा जोर वाढत आहे. सकाळी गारठा, दुपारी ऊन यामुळे थंडी, ताप, खोकला व दमांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते.
मात्र, हिवाळ्यात पहाटेच्या वेळी रक्तदाब, मधुमेह असणाऱ्या रुग्णांना जोखमीचा सामना करावा लागतो. रक्तदाब वाढला की, नाडीचा वेग वाढण्याची भीती आहे. हिवाळ्यात रक्तातील प्लेटलेट्स नसांना चिटकून असतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. यावरील उपाय सांगताना डॉ. खंडाईत यांनी धुम्रपान व तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहण्यासोबतच व्यायाम करण्याचा सल्ला दिला.
दमा वाढतोय
वैद्यकीय शास्त्रात हिवाळा हा हेल्दी सीझन समजला जातो. परंतु, पारा खाली वर होत असला की आजार होणार हे निश्चित. यामुळे खबरदारी घ्यावी लागते. वृद्धमंडळी, बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वारंवार हवामानात बदल होत असल्याने व्हायरल संसर्ग वाढतो. रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर तत्काळ विपरित परिणाम होतो. विशेष असे की, हिवाळ्यात दमा वाढतो. सीओपीडीत वाढ होते. श्वसनविकारात वाढ होते. थंडी वाढल्यामुळे सर्दीसारखे आजार होतात. पुढे न्युमोनियाचा मोठा धोका आहे. वेळीच खबरदारी न घेतल्यास आजार बळावून संधिवात असे आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यातच शहरात धुळीचे प्रमाण वाढल्याने खोकल्याचा त्रास होतो.
- डॉ. प्रवीण शिंगाडे,
सहयोगी प्राध्यापक, मेडिकल