पगाराच्या बिलावर टाकळीकरांची स्वाक्षरी

file photo
file photo

नागपूर: पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगार बिलावर लाचप्रकरणात अटक झालेले कार्यकारी अभियंता विजय टाकळीकर यांचीच स्वाक्षरी असल्याची माहिती वित्त विभागातील वरिष्ठ स्तरावरील सूत्रांकडून देण्यात आली. आठवडाभरात सादर करण्यात आलेल्या फाईलींची सुद्धा माहिती सादर करण्याच्या सूचना वित्त अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. 
विशेष म्हणजे टाकळीकरांना ज्या दिवशी एसीबीने अटक केली त्याच दिवशीच्या पगार बिलावर स्वाक्षरी दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे मोठा आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाणी पुरवठा विभागाच्या पगाराबाबतच्या दोन फाईल मंजूर करण्यात आल्या. टाकळीकरांना दोन लाख रुपये घेण्याच्या प्रकरणात एसीबीने अटक केली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी पुरवठा विभागील मर्जीतील चार कर्मचाऱ्यांनी त्यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यांच्यासोबत काही फाईल्स होत्या. यातील काही कर्मचाऱ्यांनी भेट घेतल्याची कबुली दुसऱ्या कर्मचाऱ्यांकडे दिली असून फाईल्स त्यांनी हाताळल्याचेही मान्य केले. काही कंत्राटदाबाबतची असल्याची चर्चा आहे. यामुळे त्यांनी फाईल्स बाहेर नेल्याच कशा, असाच प्रश्‍न उपस्थित होत आहे. 


कक्ष उघडेच 
कार्यकारी अभियंत्याचे कक्ष सुरूच आहे. त्यामुळे कर्मचारी फाईल्स हातळत आहे. एसीबीची कारवाई झाली असून कंत्राटबाबतचे प्रकरण होते. त्यामुळे कक्ष बंद ठेवणे गरजे आहे. यातील बहुतांश फाईल्स कर्मचाऱ्यांनी हाताळून निकाली काढल्याची शंका वर्तविण्यात येत आहे. एसीबीची कारवाई झाल्याने जिल्हा परिषदच्या प्रतिमा डागाळत असताना सीईओंचे याकडे लक्ष घालत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

हेमके, काळबांडेंचे नाव 
कार्यकारी अभियंत्याचा प्रभारसाठी उपभियंता हेमके आणि काळबांडे यांच्या नावाची फाईल्स सीईओंकडे पाठविण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेत हेमके आघाडीवर आहेत. या दोघांव्यतिरिक्त तिसऱ्याच व्यक्तीला प्रभार मिळण्यासाठी काही कंत्राटदार सक्रिय असल्याचे चर्चा आहे. प्रभार न दिल्याने विभागातील अनेक काम ठप्प पडल्याचे सांगण्यात येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com