शिक्षकांनी ‘ऐकावे तरी कोणाचे’, करावे कुणाच्या मनाचे?

file
file

पचखेडी (जि.नागपूर): राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २४ जूनला शासन निर्णय व त्यानंतर १७ ऑगष्टला शुद्धिपत्रक काढून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन व विविध शक्य असेल त्या प्रकारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवण्याचे सांगितले असून याच शासन निर्णयान्वये शिक्षकांना कोविड कामाकाजातून कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. परंतू स्थानिक प्रशासनाने कार्यमुक्तीची कार्यवाही अजूनही केली नाही. एककीडे आरोग्य विभाग, महसूल विभागाचे अधिकारी आदेश देतात तर दुसरीकडे शिक्षण विभागातील अधिकारी विद्यार्थ्यांना किती व कसे शिक्षण दिले, याचे अहवाल मागवतात. अशा दुहेरी आदेशामुळे शिक्षक हैराण झाले आहेत

अधिक वाचाः सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण

विचारमंथन करण्याची गरज
कोरोना प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात १६ मार्चपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यातरी सुरुवातीपासूनच शिक्षकांना कोरोना नियंत्रण उपाययोजना अंतर्गत विविध कामावर लावण्यात आलेले आहे. प्रथम स्वस्त धान्य दुकानावर, काहींना चेक पोस्टवर, घरोघरी जावून करावयाच्या निरंतर सर्वेक्षणावर तर काही  शिक्षकांना तालुका नियंत्रण कक्षामध्ये आठ-आठ तासाच्या कर्तव्यावर लावण्यात आले आहेत. आता तर 'माझे कुटुंब-माझी माझी जबाबदारी' उपक्रमात परिपत्रकामधील पथकात शिक्षकांचा उल्लेख नसताना घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या कामीसुद्धा लावण्यात आलेले आहे. . यातच अनेक शिक्षकांना कोरोनाची लागण होत आहे, तर काही शिक्षक मृत्युमुखी पडले आहेत. आता पुन्हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने २४ सप्टेंबरला पत्र काढून एक ‘लिंक’ दिली व या लिंकवर प्रत्येक शिक्षकांने नोंदणी करून विद्यार्थ्यांना कशाप्रकारे शिक्षण दिले व त्यांचे मुल्यमापन कसे केले, याबाबतचा आठवडी अहवाल भरण्यास सुचीत केले आहे. त्यामुळे आता ‘ऐकावे तरी कोणाचे..?’ अशी अवस्था शिक्षकांची झाली आहे. यावर आता सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन विचारमंथन करण्याची गरज आहे, असे मत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे यांनी व्यक्त केली आहे.

अधिक वाचाः संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे; डॉक्टरांच्या सल्ल्याने खवैय्ये, विक्रेत्यांचं फावलं पण व्यावसायिक घाट्यातच

कसरती करूनही उपयोग नाही
लॉकडाउन काळात चेकपोस्ट, क्वारंटाईन केंद्रे, निरंतर सर्व्हेक्षण, आरोग्य केंद्रावरील ड्युटी आणि ऑनलाइन शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे तास या साऱ्या कसरती एकहाती करूनही शेवटी शिक्षक नावाचे ‘अनसंग हिरो’ दुर्लक्षितच राहिले. मृत शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांना पन्नास लाखाच्या कोविड विम्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
-मनोज बोरकर
 कुही तालुका अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ.

गांभीर्याने लक्ष द्यावे
शिक्षकांना देशाचा कणा म्हटले जाते. शिक्षक मानसिकदृष्ट्य़ा स्वस्थ असतिल तर शिक्षण क्षेत्र मजबूत राहू शकते. पण मागील काही दिवसांत शिक्षकांकडून जे प्रशासनाचे अतिभारयुक्त काम करवीले, ते योग्य नाही. त्यामुळे शिक्षकांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम पडेल. आणि विद्यार्थ्यांकडे  दुर्लक्ष होईल.त्यांमुळे प्रशासनाने याकडे लक्ष देवून शिक्षकांना ऑनलाईन किंवा या कोरोना परिस्थितीत शिक्षण विद्यार्थ्यापर्यंत पोचवता येईल याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तरच देशातील कोरोना काळातील ढासळलेली शिक्षण व्यवस्था रुळावर येईल
.--प्रबोध धोंगडे
जिल्हा अध्यक्ष कॉस्ट्राबाईड शिक्षक संघटना

संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com