नागपुरात ऑक्सफर्ड लशीची चाचणी;  पहिल्या टप्यात कुणालाही दुष्परिणाम नाही  

testing of corona vaccine is going in nagpur
testing of corona vaccine is going in nagpur

नागपूर : कोविडच्या नियंत्रणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठात विकसित होत असलेल्या ‘कोविशिल्ड’ लशीच्या क्‍लिनिकल ट्रायलसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सुरू झाली. पहिल्या टप्प्यात मेडिकलमध्ये सुमारे ५० व्यक्तींना ही लस टोचली. 

लशीचा कोणताही दुष्परिणाम दिसून आलेला नाही. लस सुरक्षित असल्याने दुसरा टप्पा  २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. लशीची दुसरी मात्रा सुरू करताना स्वयंसेवकांच्या सर्व चाचण्या करण्यात येतील..

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये विकसित करण्यात आलेल्या लशीची चाचणी यशस्वी झाली. पुण्यातील सिरम कंपनीच्या माध्यमातून कोविशिल्ड लस लवकरच उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. या लशीची क्लिनिकल ट्रायल अंतिम टप्प्यात आहे. वैद्यकीय चाचणीनुसार ऑक्सफर्डची कोविशिल्ड लस टोचण्याला येत्या २३ नोव्हेंबरला २८  दिवस पूर्ण होतील. पुढच्या आठवड्यात दुसरी मात्रा दिली जाणार आहे. 

मेडिकलच्या केंद्रात स्क्रीनिंग झाल्यावर १८ ते ५५ वयोगटातील एकही समस्या नसलेल्या व आरोग्याच्या दृष्टीने निरोगी असलेल्या पहिल्या १५ स्वयंसेवकांना २३ आणि २४ ऑक्टोंबरला ही लस दिली. त्यानंतर इतर ३५ स्वयंसेवकांना ही लस दिली. लस देण्यापूर्वी संबंधित स्वयंसेवकांच्या कोरोनासह इतरही तपासणी घेत त्यांचा मधुमेह, उच्च रक्तदाबासह इतरही इतिहास घेण्यात आला. त्यानंतर एकही आजार व गुंतागुंत नसलेल्या स्वयंसेवकांना ही लस दिली. लस दिल्यावर पहिले दोन तास स्वयंसेवकांना एका विशिष्ट वॉर्डात डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवले गेले. 

पहिल्या टप्प्यात लस टोचल्यानंतर सर्व स्वयंसेवकांना डॉक्टरच्या निरीक्षणात ठेवण्यात आले. कोणालाही दुष्परिणाम दिसला नाही. त्यांचे समुपदेशन करण्यात आले. 

मेडिकलच्या डॉक्टरांमध्ये सध्या उत्साह आहे. आता दुसऱ्या लशीनंतर या लशीचा अँटिबॉडी निर्माण करण्यावर सकारात्मक परिणामाकडे लक्ष लागून आहे. मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या नेतृत्वात क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. यात वैद्यकीय अधीक्षक तसेच या प्रकल्पाचे उपसमन्वयक डॉ. अविवाश गावंडे यांचे मोलाचे योगदान आहे. 
-डॉ. सुशांत मेश्राम, समन्वयक, 
कोविशिल्ट लस क्लिनिकल ट्रायल तसेच विभागाप्रमुख श्वसनरोग, मेडिकल-सुपर
 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com