कामावर मजूर मिळत नाही म्हणून शेतक-यांनी केले असे, वाचा...

संदीप गौरखेडे
रविवार, 21 जून 2020

भात लागवडीसाठी आणि निंदण करण्यासाठी भंडारा, गोंदिया जिल्ह्याबरोबरच छत्तीसगड राज्यातून बरेच मजूर येत असतात. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे मजूर मजुरीसाठी भटकंती करणार नाही आणि त्यातच वाहतूक व्यवस्था बंद. त्यामुळे बऱ्यांच शेतकऱ्यांनी भातलागवडीची पद्धत बदलविली आहे

कोदामेंढी (जि.नागपूर) : कोरोनाने हाहाकार माजविला. टाळेबंदी आणि मजुरांचे स्थलांतरण त्यातच लागवडीसाठी मजूर मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे भात (धान) लागवडीच्या पद्धतीत बदल होत आहेत. मजूर मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी भात लागवडीच्या पद्धतीत बदल केलेला आहे.

पूर्व विदर्भात भात पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. जिल्ह्यात मौदा तालुकादेखील भाताच्या लागवडीत अग्रेसर आहे. वेळीच पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आणि पेरणीच्या कामाला लागला. मौदा तालुक्‍यात आजपावेतो 136 मिलीमीटर पाऊस झाल्याने जवळपास 40 टक्‍के पेरण्या झाल्या.
आणखी वाचा : अरेच्चा ! पेरले ते उगवलेच नाही, काय कारण असावे बरे, वाचाच...

टिपीव पद्धतीने भाताची लागवड
भात लागवडीसाठी आणि निंदण करण्यासाठी भंडारा, गोंदिया जिल्ह्याबरोबरच छत्तीसगड राज्यातून बरेच मजूर येत असतात. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे मजूर मजुरीसाठी भटकंती करणार नाही आणि त्यातच वाहतूक व्यवस्था बंद. त्यामुळे बऱ्यांच शेतकऱ्यांनी भातलागवडीची पद्धत बदलविली आहे. पऱ्हे टाकून बांधणीत चिखल करणे आणि रोवणी लावणे या पद्धतीतून मोकळे होण्यासाठी सीडील, आवत्या (फेकीव) आणि टिपीव पद्धतीने भाताची लागवड केली जात आहे. ही पद्धत कमी खर्चिक असून आणि योग्य नियोजन केल्यास कमी कालावधित अधिक उत्पादन मिळेल, असे शेतकरी सांगतात. तालुक्‍यात 44 हजार 487 हेक्‍टर आर. शेतीचे क्षेत्रफळ असून, 46 हजार 972 हेक्‍टर आर. शेतपिकांचे नियोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा : आनंदाची बातमी ! कोरोनामुळे नागपूर जिल्हयाची ही समस्या काही प्रमाणात सुटेल

पिकाचे नाव क्षेत्र
भात (धान) लागवड 37 हजार 113 हेक्‍टर आर.
पऱ्हे लागवड 1,600 हेक्‍टर आर. (10 पट रोवणी होणार)
:
सीडील लागवड
6,000 हेक्‍टर आर.
:
आवत्या (फेकीव)
आवत्या (फेकीव) : 3,500 हेक्‍टर आर.
टिपीव लागवड 200 हेक्‍टर आर.
तूर लागवड 600 हेक्‍टर आर
सोयाबीन लागवड 1,600 हेक्‍टर आर
कापूस लागवड : 1,325 हेक्‍टर आर

 

शिबिरातून केले मार्गदर्शन
मजूर मिळणार नाही म्हणून भात लागवडीची पद्धत बदलविण्याबाबत शेतकऱ्यांसाठी शिबिर राबविण्यात आले. सीडिल आणि आवत्या पद्धतीने भाताची लागवड केल्यास आणि योग्य नियोजन केल्यास खर्च कमी लागेल आणि उत्पादन चांगले होईल.
-रविकांत वासनिक
तालुका कृषी अधिकारी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no labor at work