हिंगण्यात वाजतोय चोरट्यांचा डंका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

हिंगणा (जि.नागपूर): धनगरपुऱ्यातील हिंगणा टाऊन सिटी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. बंद डुप्लेक्‍स चोरट्यांनी फोडून साहित्य लांबवले. चारचाकी वाहनाचे सुट्‌टे भाग चोरट्यांनी लंपास केले. चोरांचा धुमाकूळ सुरू असतानाही पोलिस चौकी कुलूपबंद आहे. यामुळे पोलिस विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

क्‍लिक करा  : खुशखबर ! खुशखबर ! तांदुळ, डाळीच्या भावात घसरगुंडी

हिंगणा टाऊन पोलिस चौकी कुलूपबंद
हिंगणा शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे. धनगरपुरा परिसरात विदर्भ बिल्डरने हिंगणा सिटी व हिंगणा टाऊन अशा दोन वसाहती उभारल्या. या ठिकाणी शेकडो कुटुंब वास्तव्याला आले आहेत. जनतेच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी हिंगणा टाऊन येथे पोलिस चौकी उभारली. तत्कालीन ठाणेदार बारापात्रे यांच्या कार्यकाळात पोलिस चौकीचे उद्‌घाटन झाले. हिंगणा टाऊन परिसरातील नारंग यांच्या मालकीचे बंद डुपलेक्‍स चोरट्यांनी फोडले. महागड्या किमतीचे नारळाचे संपूर्ण साहित्य चोरट्यांनी लांबवले. यानंतर चोरट्यांनी गाळेधारकांच्या चारचाकी वाहनांची "नंबर प्लेट' चोरून नेली. मागील आठवडाभरापासून हा प्रकार कॉलनीत सुरू आहे. नारंग चंद्रपूर येथे वास्तव्याला असल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. हिंगणा टाऊन पोलिस चौकीचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक मल्हार डोईफोडे आहेत. मागील काही दिवसांपासून हीच पोलिस चौकी कुलूपबंद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

क्‍लिक करा  : शिवभक्‍तांनो पचमढी यात्रेला जाताय? जाणून घ्या बसचे वेळापत्रक

नागरिकांत भीतीचे वातावरण
चोरीच्या घटना वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिस प्रशासनाने हिंगणा डाऊन वहिनींना सिटी परिसरात रात्रीची गस्त राबवावी, अशी मागणी तारुष बांदरे, विपिन काकडे, योगेश बोंडे, शंतनू वडनेरकर, राजेंद्रसिंग तोमर, योगेश काळे, ओमप्रकाश ठाकरे, कुंदन मते यांनी केली आहे. चोरट्यांचा धुमाकूळ थांबविण्यासाठी पोलिस प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thieves blow in the hingena