अखेर चोरट्यांचा दरोड्याचा कट फसला; सीसीटिव्हीतील फुटेजवरून संशय 

thieves failed to do theft as cctv was available
thieves failed to do theft as cctv was available

सावनेर (जि. नागपूर) ; येथील दादाजी नगर येथील वस्तीमध्ये रात्रीच्या सुमारास एका नागरिकाच्या घरा सभोवताल सतत दोन तास पाहणी करत असलेल्या ४ ते ५ अट्टल चोरट्यांचे व्हिडीओ फुटेज घराला लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले असून मात्र हा दरोड्याचा प्रयत्न असफल झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार सावनेर पोलिसांना चोरट्यांबाबत तक्रार नोंदवली असून प्रदीप बावनकर हे वेकोलिचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी आहेत. त्याच्या घरी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. त्यापैकी वाशिंग एरियामधील कॅमेराची दिशा बदलल्याचे त्यांना आढळून आल्याने त्यांच्या मनात संशय आला. त्यांनी तातडीने फुटेज बघितले असता काही बाबी दिसून आल्या. 

२२ सप्टेंबरला १२.१५ च्या सुमारास २-३ व्यक्ती श्री.बर्डे घराच्या बाजूने येताना दिसल्या. त्यांच्या हातात टॉर्च असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर थोड्या वेळाने एक जण उभा होऊन घराच्या मागे जाताना दिसला. यात त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या तोंडावर मास्क होते. तो लपून भिंतीच्या साईडने मागे जाताना दिसत आहे. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्यापैकी एक जण मेन गेटच्या कॉलमजवळ उभा असून त्याच्या घराच्या मुख्य प्रवेशदाराच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्यावर सतत टॉर्च मारताना दिसतो. बाजूला असलेल्या खाली प्लॅटवर काही व्यक्तींजवळ टॉर्च असल्याचे दिसून आले. 

नंतर २.३० च्या सुमारास प्रदीप बावनकर यांच्या घरामागून रवी गायकवाड यांच्या घराच्या बाजूला असलेल्या रोडवरून एका पाठोपाठ एक असे सहा जण जाताना दिसून आले. हे सर्व डॉ.विश्वास यांच्या घराकडे जाताना दिसून आले. नंतर बावनकर यांच्या घरी चोरी करण्याकरिता गेलेले हे सर्वे चोरटे मानकर यांच्या शेताला असलेले लोखंडी जाळीचे कुंपण तोडताना आढळले. 

७ सप्टेंबरला रात्री १२ च्या सुमारास व रात्री १४ सप्टेंबर २०२० च्या १.३० च्या सुमारास काही चोरटे टॉर्च घेऊन ‘रेकी’ करीत असल्याचे दिसून आले. २२ सप्टेंबरला सहा चोरटे सलग ३ तास काय करीत होते, हे समजेनासे झाले आहे. कदाचित यांचा मोठा दरोडा टाकण्याचा प्रयत्न असावा, परंतू तो काही कारणांनी टळला, अशी शंका आहे. 

शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन 

कोरोनाच्या काळात बेरोजगारी वाढली व काम बंद असल्याने अट्टल चोरट्यांनी घरफोडी, लूटमारीच्या मार्गाने धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी रात्री पेट्रोलिंगच्या गाड्या वस्तीमधील नगरात ले-आउटमध्ये प्रवेश करून नागरिकांची रक्षा म्हणून कार्य केले तर नक्कीच होत असलेल्या चोरीच्या घटनेत आळा बसेल. पोलिस ठाण्यात गेल्या महिन्यात बऱ्याच छोट्या मोठ्या चोरीच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. करिता पोलिसांनी रात्रीच्या वेळेस शहरात गस्त घालावी अशी चर्चा नागरिकांतून व्यक्त केली जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com