नाल्यात वाहून गेलेल्या मुलीचा मृतदेह आढळला; आईकडून पैसे आणणे बेतले जीवावर

अनिल कांबळे
Friday, 16 October 2020

आईला भेटून परत येत असताना सालेहा आणि जवेरिया पूर ओलांडत होत्या. अचानक सालेहाचे संतुलन बिघडले आणि ती नाल्यात पडली. यावेळी पाण्याचा वेग खूप होता. जवेरियाने मदतीसाठी आवाज दिला. जवळ बसलेल्या एका तरुणाने नाल्यात उडी मारली पण तोपर्यंत सालेहा खूप दूरपर्यंत वाहून गेली होती.

नागपूर : पाण्याच्या पाईपलाईनवरून जाताना नदीत बुडालेल्या तेरा वर्षीय मुलीचा पावनगाव परिसरात मृतदेह आढळला. शैलिया ऊर्फ मुस्कान अन्सारी (रा. संगमननगर) असे मृत मुलीचे नाव आहे.

बुधवारी दुपारी शैलिया व तिची मोठी बहीण जवेरिया या दोघी पाण्याच्या पाईपलाईनच्या बाजूला असलेल्या जागेतून जात होत्या. तोल गेल्याने शैलिया नदीत पडली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी शौलियाचा शोध घेतला असता आढळून आली नाही.

हेही वाचा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स

गुरुवारी दुपारी कळमन्यातील पावनगाव परिसरात नदीच्या काठावर मुलीचा मृतदेह आढळला. पोलिस तेथे पोहोचले. मृतदेह शौलियाचाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. २०१८ मध्ये वनदेवीनगर येथे अशाच प्रकारे पडून एका मुलाचा मृत्यू झाला होता.

सालेहाची आई शफीकनिसा मजुरी करून घर चालवते. बुधवारी सकाळी शफीकनिसा कामावर गेली. मुलांना पैशांची गरज होती म्हणून मोठी बहीण जवेरिया फरहतसह मुस्कान आईकडून पैसे घेण्यासाठी गेली होती. वनदेवीनगरात मागील तीन वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कारणास्तव दोन वस्त्यांना मोठ्या पाइपद्वारे जोडण्यासाठी तीन फूट रुंद लोखंडी पूल बांधला गेला. या वस्तीतील सर्व नागरिकांना या पुलावरून यावे लागते.

ठळक बातमी - ‘ये लाईफ मैं डिझर्व्ह नही करता’, असे चिठ्ठीत लिहून पुण्यातील अभियंत्याची आत्महत्या

आईला भेटून परत येत असताना सालेहा आणि जवेरिया पूर ओलांडत होत्या. अचानक सालेहाचे संतुलन बिघडले आणि ती नाल्यात पडली. यावेळी पाण्याचा वेग खूप होता. जवेरियाने मदतीसाठी आवाज दिला. जवळ बसलेल्या एका तरुणाने नाल्यात उडी मारली पण तोपर्यंत सालेहा खूप दूरपर्यंत वाहून गेली होती. स्थानिक लोकांनी नाल्यात तिचा शोध सुरू केला, पण उपयोग झाला नव्हता.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen year old girl body was found in Nala