मद्यनिर्मिती कारखाने करताहेत सॅनिटायझरचे उत्पादन

handsanitizer_
handsanitizer_

नागपूर  : कोरोना आजारावर नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कसोशीने प्रयत्न होत असताना मदतीसाठी सामाजिक संस्थाही सरसावल्या आहेत. कोरोनावर आळा घालण्यासाठी सॅनिटायझर आवश्‍यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन मद्यनिर्मिती कारखान्यांनी सॅनिटायझर तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील विविध रुग्णालयांना नि:शुल्क पुरवठाही करण्यात येत आहे.

देशात सर्वत्र सॅनिटायझर व मास्कचा तुटवडा आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यनिर्मिती कारखान्यांना सॅनिटायझर निर्मितीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत शहरातील नागपूर डिस्टीलरी प्रा. लि. या बॉटलिंग प्लांट, रॉयल ड्रिंक व मानव ऍग्रो इंडस्ट्रीयल बेला या तीन कंपन्यांनी सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. दिवसाला सुमारे एक हजार लिटरहून अधिक उत्पादन प्रत्येक कंपनीत केले जात आहे. ते धर्मादाय, खासगी, सरकारी रुग्णालये तसेच डॉक्‍टर्स आणि वितरकांना वाटप केले जात आहे. नागपुरातच सॅनिटायझर उपलब्ध होत असल्याने शहरात तुटवडाही कमी झाल्याचे दिसून येत आहे.
येथे तयार होणाऱ्या सॅनिटायझरची प्रशासनाला मदत झाली आहे. नागपूर डिस्टीलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांनी सांगितले की, शासनाने आवाहन केल्यावर आम्ही अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी घेतली.

तीन कंपन्या  सॅनिटायझरची निर्मिती

संचारबंदीच्या काळात कारखाना सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. कामगारांना येता यावे म्हणून पोलिसांनी मदत केली. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या सहकार्यामुळेच ही बाब शक्‍य झाली आहे. आज जिल्ह्यात तीन कंपन्या या सॅनिटायझरची निर्मिती करीत आहेत. यातील नागपूर डिस्टीलरी प्रा. लि. हे 40 हजार लिटर सॅनिटायझर तयार करणार आहे. यातील 25 हजार लिटर हे शासनाला देणार आहे. यातील 5 हजार लिटर सॅनिटायझर शहरातील विविध सरकारी दवाखान्यांमध्ये वितरित केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com