Video : खगोलप्रेमींना आकाश निरीक्षणाची उत्तम संधी, एकाच महिन्यात तीन लाभ

Three lunar and solar eclipses can be seen in a single month
Three lunar and solar eclipses can be seen in a single month

नागपूर : टाळेबंदीमुळे घरात बंदिस्त असलेल्या खगोलप्रेमींना या महिन्यात आकाश निरीक्षणांची चांगली संधी येणार आहे. कारण पाच जून ते पाच जुलै या एकाच महिन्यात तीन ग्रहणे खगोलशास्त्र अभ्यासकांना अनुभवता येणार आहे. ग्रहणामुळे नैसर्गिक आपत्ती येतील, सावधान राहा यासारखे मेसेज फिरत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असून निष्कारण लोक भयभीत होत आहेत. मात्र, ते पूर्णपणे चुकीचे आहेत.

या ग्रहणांमधील केवळ एकच ग्रहण म्हणजे 21 जून 2020 चे सूर्यग्रहण फक्त भारतात दिसणार आहे. 5 जून व 5 जुलै 2020 ची चंद्रग्रहणे "छायाकल्प' स्वरूपाची असणार आहेत. चंद्र ग्रहणाचे तीन प्रकार असतात. पहिला पूर्ण चंद्रग्रहण, दुसरा आंशिक चंद्रग्रहण आणि तिसरा छायाकल्प चंद्रग्रहण. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते तेव्हा चंद्रावर पडणारी सूर्यकिरण थांबून जाते आणि त्यावर पृथ्वीची सावली पडू लागते. याला पूर्ण चंद्रग्रहण असे म्हटले जाते.

जेव्हा चंद्र पूर्णपणे लपत नाही आणि चंद्राची काळी सावली पृथ्वीवरदेखील पडत नाही तेव्हा त्याला छायाकल्प चंद्र ग्रहण म्हणतात. हे ग्रहण पूर्ण आणि आंशिक चंद्रग्रहणापेक्षा कमजोर असते. त्यामुळे स्पष्टपणे बघणे अवघड जाते. 5 जून व 5 जुलै 2020 या दिवशी होणाऱ्या छायाकल्प चंद्रग्रहणांचे कोणतेही वेधादि नियम पाळू नयेत, असे ज्योतिष्य रत्न पंडित देवव्रत बूट यांनी म्हटले आहे.

21 जून 2020 चे सूर्यग्रहण फक्त भारतात दिसणार असल्याने या ग्रहणाचे वेधादि नियम गर्भवती व सर्व लोकांनी पाळावेत असे त्यांचे म्हणणे आहे. या वर्षाचे पहिले चंद्रग्रहण 10 जानेवारी 2020 रोजी झाले. जून व जुलै महिन्यातील चंद्रग्रहण झाल्यानंतर 30 नोव्हेंबर व 14 डिसेंबर रोजी होणार आहेत. सूर्यग्रहण पाहताना डोळ्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येते असेही त्यांचे म्हणणे आहे.

चंद्रग्रहण तीन प्रकारचे होते
खग्रास चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून जातो
खंडग्रास चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या अर्धवट छायेतून जातो
छायाकल्प चंद्रग्रहण : यात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून जातो

कुठलीही अंधश्रद्धा पाळू नका
चंद्रावर विरळ छाया पडळ्यामुळे चंद्र लालसर किंवा काळा दिसत नाही. परंतु, त्याची तेजस्विता थोडी कमी होते. जूनचे हे चंद्रग्रहण पाच जूनला रात्री 11.15 वा लागेल. ग्रहण मध्य (6 जून) रात्री 12.54 वा तर ग्रहण रात्री 2.34 वा सुटेल. या ग्रहणात चंद्राच्या अर्ध्या भागावरच उपछाया पडेल. त्यामुळे चंद्राची तेजस्विता केवळ पाच टक्‍क्‍यांनी कमी होईल. कुठल्याही अंधश्रद्धा न पाळता हे ग्रहण पाहावे.
-प्रा. सुरेश चोपणे,
अध्यक्ष स्काय वाच ग्रुप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com