यवतमाळची वाघीण विलगीकरणात 

file photo
file photo

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्‍वर अभयारण्याच्या क्षेत्रात पकडलेल्या (टी २ सी १) या वाघिणीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणले असून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मे महिन्यापासून जेरबंद करुन गोरेवाड्यात आलेली हा सहावा वाघ आहे. 

महिलेवर हल्ला करून ठार केल्यानंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वन विभागाने तातडीने पावले उचलीत वाघिणीला पकडले आहे. केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार शहराच्या बाहेरून आलेल्या वन्यप्राण्याला विलगीकरणात ठेवण्यात येत आहे. . 
अमेरिकेतील प्राणीसंग्रहालयात वाघाला कोरोना झाल्याची निष्पन्न झाल्यानंतर दक्षता म्हणू आदेश काढण्यात आलेत. तेव्हापासून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

हेही वाचा : कोरोना संक्रमणाची भीती वाटतेय? अशा करा भाज्या स्वच्छ! 
https://www.esakal.com/health-fitness-wellness/how-clean-vegetables-349595?amp :

वाघाला दोन आठवडे विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. प्रथमदर्शनी वाघिणीची तब्ब्येत सुस्थितीत असल्याचे दिसून आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष दिले जाणार आहे. उद्या गुरुवारी विष्ठेचे नमुने घेण्यात येणार आहे. त्यानंतर खाद्यही पुरविले जाणार असल्याची माहिती आहे.
 

संपादन : मेघराज मेश्राम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com